India vs England 2nd T20I Live Updates : नोव्हेंबर २०२१मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करणाऱ्या रिचर्ड ग्लीसन ( Richard Gleeson) याने जुलै २०२२मध्ये ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ३४ वर्ष व २१९ दिवस वय असलेला ग्लीसन हा इंग्लंडकडून पदार्पण करणारा तिसरा वयस्कर खेळाडू आहे. पण, त्यानेच टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले. रोहित शर्मा व रिषभ पंत यांच्या वादळी खेळीला त्याने ब्रेक लावलाच आणि त्यानंतर ४० धावांत टीम इंडियाचे ५ फलंदाज इंग्लंडने माघारी पाठवले.
पहिल्याच षटकात
रोहित शर्माचा सोपा झेल सुटला अन्
रिषभ पंत रन आऊट होता होता वाचला. पॉवर प्लेमध्ये क्षेत्ररक्षकांना असलेल्या मर्यादेचा फायदा उचलताना रोहित व रिषभने उत्तुंग फटके मारले. रिषभ भन्नाट फॉर्मात आहे आणि त्याचा रिव्हर्स स्वीप षटकार पाहण्यासारखा होता. पाचव्या षटकात पदार्पणवीर ग्लीसन गोलंदाजीला आला अन् पाचव्या चेंडूवर त्याने रोहितला बाद केले. यष्टिरक्षक जोस बटलरने ( Jos Buttler) परतीचा भन्नाट कॅच घेतला. रोहित २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावांवर बाद झाला. रोहितने ट्वेंटी-२०त ३०० चौकार मारणाऱ्या पहिल्या भारतीयाचा मान पटकावला.
त्यानंतर सातव्या षटकात विराटला ( १) धावांवर माघारी पाठवले आणि पुढच्याच चेंडूवर रिषभची विकेट घेतली. डेवीड मलानने विराटचा अप्रतिम झेल घेतला. पुढच्याच चेंडूवर रिषभ बटलरकरवी झेलबाद झाला. रिषभने १५ चेंडूंत २६ धावा केल्या. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवही ( १५) झेलबाद झाला अन् भारताला ८९ धावांवर चौथा धक्का बसला. पुढच्याच चेंडूवर हार्दिक ( १२) बॅकवर्ड पॉईंटला मलानच्या हाती झेलबाद झाला. बिनबाद ४९ अशा अवस्थेतून भारतीय संघ ५ बाद ८९ धावा अशा संकटात सापडला.
( IND vs ENG 2nd T20I धावफलक एका क्लिकवर ) Web Title: IND vs ENG 2nd T20I Live Updates : from 0/49 to 5/89, India loss five wickets in just 40 runs, Richard Gleeson take 3 & chris jorden take 2 wickets, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.