Bhuvneshwar Kumar, IND vs ENG 2nd T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली

India vs England 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पुन्हा एकदा सुरुवातीच्या षटकांत इंग्लंडला हादरवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 10:21 PM2022-07-09T22:21:42+5:302022-07-09T22:31:26+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 2nd T20I Live Updates : India seal the series in Birmingham, India win by 49 runs. Series 2-0 | Bhuvneshwar Kumar, IND vs ENG 2nd T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली

Bhuvneshwar Kumar, IND vs ENG 2nd T20I Live Updates : भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला शरणागती पत्करण्यास भाग पाडले; रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मालिका जिंकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd T20I Live Updates : भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पुन्हा एकदा सुरुवातीच्या षटकांत इंग्लंडला हादरवले. भुवीच्या दमदार कामगिरीनंतर जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah)  व युजवेंद्र चहल ( Yuzvendra Chahal ) यांनी टीम इंडियाला विकेटमागून विकेट मिळवून दिली अन् विजय निश्चित केला. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. २०१४नंतर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२० मालिका हरलेला नाही. २०१६ ( घरच्या मैदानावर) व २०१८ ( परदेशात) मध्ये भारताने २-१ अशा फरकाने, तर २०२१मध्ये ( घरच्या मैदानावर) ३-२ अशा फरकाने मालिका जिंकली आहे. २०१४मध्ये भारताला ०-१ अशी हार मानावी लागली, तर २०१२ मध्ये १-१असा बरोबरीचा निकाल लागला होता.

रोहित शर्मा व रिषभ पंत यांनी ४९ धावांची भागीदारी केली. पण, बिनबाद ४९ वरून भारताचे पाच फलंदाज ८९ धावांत तंबूत परतले. रोहित ( ३१), विराट कोहली ( १), रिषभ ( २६), सूर्यकुमार यादव ( १५)  व हार्दिक पांड्या ( १२) माघारी परतले. रवींद्र जडेजा व दिनेश कार्तिक यांनी टीम इंडियाचा डाव सावरताना ३३ धावांची भागीदारी केली, परंतु जोस बटलरने अनपेक्षितरित्या ही भागीदारी संपुष्टात आणली. जडेजाने अखेरपर्यंत खिंड लढवली. त्याने २९ चेंडूंत नाबाद ४६ धावा केल्या आणि भारताला ८ बाद १७० धावांपर्यंत नेले. रिचर्ड ग्लीसन ( Richard Gleeson) ने पदार्पणात टीम इंडियाचे धाबे दणाणून सोडले. ग्लीसनने ४-१-१५-३ अशी कामगिरी केली, तर जॉर्डनने ४-०-२७-४ अशी सुरेख कामगिरी करताना भारताला मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. 


प्रत्युत्तरात पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमारने ( Bhuvneshwar Kumar) पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला ( गोल्डन डक) बाद केले. त्यानंतर तिसऱ्या षटकात भुवीच्याच गोलंदाजीवर यष्टिंमागे रिषभ पंतने सुरेख झेल घेत जोस बटलरला ( ४) माघारी पाठवले. लिएम लिव्हिंगस्टोन फटकेबाजी करताना पाहून जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला अन् लिव्हिंगस्टोनचा ( १५) त्रिफळा उडवून गेला. इंग्लंडचे ३ फलंदाज २७ धावांवर माघारी परतले. युजवेंद्र चहलने त्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडला मोठा धक्का दिला. हॅरी ब्रूक ८ धावांवर सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद होऊन माघारी परतला. इंग्लंडने ९ षटकांत ४ बाद ५५ धावा केल्या आहेत. पुढच्या षटकात चहलने इंग्लंडचा आणखी एक सेट फलंदाज मलानला ( १९) माघारी जाण्यास भाग पाडले. त्यानंतर बुमराहने सॅम कुरनची ( २) विकेट घेत इंग्लंडला ६० धावांवर ६वा धक्का दिला. 

भारतासाठी जे काम जडेजाने केलं, तेच मोईन अली ( Moeen Ali) इंग्लंडसाठी करताना दिसला. तो एका बाजूने खिंड लढवत होता आणि जडेजा व हार्दिकला त्याने खेणखणीत षटकारही खेचले. पण, चेंडू व धावा यातील दरी वाढत राहिली अन् ती कमी करण्याच्या प्रयत्नात अली ३५ धावांवर बाद झाला. १५व्या षटकात ख्रिस जॉर्डन ( १) धावबाद झाला, डेव्हिड विलीने त्याला दुसरी धाव घेण्यासाठी साथच दिली नाही. भुवीने आजच्या सामन्यातली तिसरी विकेट घेतलाना रिचर्ड ग्लीसनला ( २) बाद केले. हर्षल पटेलने अखेरची विकेट घेत इंग्लंडचा डाव १२१ धावांवर गुंडाळला. भारताने ४९ धावांनी हा सामना जिंकला. 

Web Title: IND vs ENG 2nd T20I Live Updates : India seal the series in Birmingham, India win by 49 runs. Series 2-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.