Rohit Sharma, IND vs ENG 2nd T20I Live Updates : रोहित शर्माची विक्रमी कामगिरी; पण, ३४ वर्षीय रिचर्ड ग्लीसनने दिले तीन धक्के, विराट कोहली पुन्हा फेल, Video

India vs England 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा व रिषभ पंत या जोडीने भारताला दमदार सुरुवात करून दिली खरी, परंतु ३४ वर्षीय पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसन ( Rischard Gleeson) याने भारताला धक्के दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 07:40 PM2022-07-09T19:40:20+5:302022-07-09T19:40:46+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 2nd T20I Live Updates : Rohit Sharma becomes the first Indian to complete 300 fours in T20I, Rohit, Virat Kohli & Rishabh pant, Three big wickets for Richard Gleeson in his first spell in T20I cricket, Video | Rohit Sharma, IND vs ENG 2nd T20I Live Updates : रोहित शर्माची विक्रमी कामगिरी; पण, ३४ वर्षीय रिचर्ड ग्लीसनने दिले तीन धक्के, विराट कोहली पुन्हा फेल, Video

Rohit Sharma, IND vs ENG 2nd T20I Live Updates : रोहित शर्माची विक्रमी कामगिरी; पण, ३४ वर्षीय रिचर्ड ग्लीसनने दिले तीन धक्के, विराट कोहली पुन्हा फेल, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd T20I Live Updates : रोहित शर्मारिषभ पंत या जोडीने भारताला दमदार सुरुवात करून दिली खरी, परंतु ३४ वर्षीय पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसन ( Rischard Gleeson) याने भारताला धक्के दिले. ग्लीसनने पॉवर प्लेच्या पाचव्या षटकात रोहितची विकेट घेतली. त्यानंतर विराट कोहलीरिषभ पंत यांनाही माघारी पाठवले. इंग्लंडने आजच्या सामन्यात ३४ वर्षीय रिचर्ड ग्लीसन या अष्टपैलू खेळाडूला पदार्पणाची संधी दिली. इंग्लंडकडून पदार्पण करणारा रिचर्ड हा तिसरा वयस्कर खेळाडू ठरला. पॉल निक्सनने ३६ वर्ष व ८० दिवसांचा असताना पदार्पण केले होते. त्यानंतर डॅरेन गूचने ३४ वर्ष व २६८ दिवसांचे असताना आणि आता रिचर्डने  ३४ वर्ष व २१९ दिवसांचा असताना पदार्पण केले आहे. 

पहिल्याच षटकात रोहित शर्माचा सोपा झेल सुटला अन् रिषभ पंत रन आऊट होता होता वाचला... जीवदान मिळाल्यानंतर दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पहिल्या सहा षटकांत क्षेत्ररक्षकांना असलेल्या मर्यादेचा फायदा उचलताना रोहित व रिषभने उत्तुंग फटके मारले. रिषभ भन्नाट फॉर्मात आहे आणि त्याचा रिव्हर्स स्वीप षटकार पाहण्यासारखा होता. ही जोडी तोडण्यासाठी मोईन अलीला आणले, परंतु त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

पाचव्या षटकात पदार्पणवीर ग्लीसन गोलंदाजीला आला अन् रोहितने चौकार खेचून त्याचे स्वागत केले, परंतु पाचव्या चेंडूवर त्याने रोहितला बाद केले. बाऊंन्सवर फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. यष्टिरक्षक जोस बटलरने ( Jos Buttler) परतीचा भन्नाट कॅच घेतला. रोहित २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावांवर बाद झाला. रोहितने ट्वेंटी-२०त ३०० चौकार मारणाऱ्या पहिल्या भारतीयाचा मान पटकावला. त्यानंतर सातव्या षटकात विराटला ( १) धावांवर माघारी पाठवले आणि पुढच्याच चेंडूवर रिषभची विकेट घेतली. रिषभने १५ चेंडूंत २६ धावा केल्या. 


Web Title: IND vs ENG 2nd T20I Live Updates : Rohit Sharma becomes the first Indian to complete 300 fours in T20I, Rohit, Virat Kohli & Rishabh pant, Three big wickets for Richard Gleeson in his first spell in T20I cricket, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.