India vs England 2nd T20I Live Updates : रोहित शर्मा व रिषभ पंत या जोडीने भारताला दमदार सुरुवात करून दिली खरी, परंतु ३४ वर्षीय पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसन ( Rischard Gleeson) याने भारताला धक्के दिले. ग्लीसनने पॉवर प्लेच्या पाचव्या षटकात रोहितची विकेट घेतली. त्यानंतर विराट कोहली व रिषभ पंत यांनाही माघारी पाठवले. पाच महिन्यानंतर विराट कोहली ट्वेंटी-२० क्रिकेट खेळण्यासाठी मैदानावर उतरला. रिषभ फटकेबाजी करत असल्याने तो बचावात्मक खेळत होता. पण, ३४ वर्षीय गोलंदाज रिचर्ड ग्लीसनने पदार्पणात तीन मोठ्या विकेट्स घेतल्या. त्यात विराटचाही समावेश होता. डेवीड मलानने परतीचा अप्रतिम झेल टिपला. ( IND vs ENG 2nd T20I धावफलक एका क्लिकवर )
पहिल्याच षटकात रोहित शर्माचा सोपा झेल सुटला अन् रिषभ पंत रन आऊट होता होता वाचला... जीवदान मिळाल्यानंतर दोघांनी फटकेबाजीला सुरुवात केली. पहिल्या सहा षटकांत क्षेत्ररक्षकांना असलेल्या मर्यादेचा फायदा उचलताना रोहित व रिषभने उत्तुंग फटके मारले. रिषभ भन्नाट फॉर्मात आहे आणि त्याचा रिव्हर्स स्वीप षटकार पाहण्यासारखा होता. पाचव्या षटकात पदार्पणवीर ग्लीसन गोलंदाजीला आला अन् रोहितने चौकार खेचून त्याचे स्वागत केले, परंतु पाचव्या चेंडूवर त्याने रोहितला बाद केले. बाऊंन्सवर फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित झेलबाद झाला. यष्टिरक्षक जोस बटलरने ( Jos Buttler) परतीचा भन्नाट कॅच घेतला. रोहित २० चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ३१ धावांवर बाद झाला. रोहितने ट्वेंटी-२०त ३०० चौकार मारणाऱ्या पहिल्या भारतीयाचा मान पटकावला.
त्यानंतर सातव्या षटकात विराटला ( १) धावांवर माघारी पाठवले आणि पुढच्याच चेंडूवर रिषभची विकेट घेतली. रिषभने १५ चेंडूंत २६ धावा केल्या. ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादवही ( १५) झेलबाद झाला अन् भारताला ८९ धावांवर चौथा धक्का बसला.