India vs England, 2nd Test Day 1 : गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकलेला अक्षर पटेल ( Axar Patel) आजच्या सामन्यातून टीम इंडियात कसोटी पदार्पण करत आहे. टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) याला विश्रांती दिली असून मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) याचे पुनरागमन होत आहे. इंग्लंडनं पहिली कसोटी जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतल्यानं टीम इंडियाला हा सामना जिंकणं आवश्यक आहे. इंग्लंडनंही आजच्या सामन्यात संघात चार बदल केले आहेत.
यांच्या जोडीला अक्षर पटेल हा तिसरा फिरकीपटू म्हणून संघात असेल, अक्षर पटेल २०१४पासून कसोटी पदार्पणाची वाट पाहत होता. जलदगती गोलंदाजांच्या ताफ्यात एक बदल झाला आहे. इशांत शर्माच्या जोडीला या सामन्यात मोहम्मद सिराज दिसेल. जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १० Sexiest खेळाडूंमध्ये पाच भारतीय; शेवटचं नाव पाहून बसेल आश्चर्याचा धक्का!
टीम इंडिया ( Team India's playing XI for 2nd Test) : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, रिषभ पंत, कुलदीप यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज
इंग्लंडचा संघ ( England's playing XI for 2nd Test) : - जो रुट ( कर्णधार) , मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, बेन फोक्स ( यष्टिरक्षक), डॅन लॉरेन्स, जॅक लिच, ऑली पोप, डॉम सिब्ली, बेन स्टोक्स, ऑली स्टोन.