Join us  

India vs England, 2nd Test : भारतीय संघाचा मोठा विजय, विराट कोहलीची MS Dhoniशी बरोबरी

Virat Kohli Equal MS Dhoni : India vs England, 2nd Test Day 4: आर अश्विनच्या ( R Ashwin) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत मोठ्या विजयाची नोंद केली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 16, 2021 12:42 PM

Open in App
ठळक मुद्देआठ विकेट्स अन् शतक झळकावणाऱ्या आर अश्विनला मॅन ऑफ दी मॅचपदार्पणात अक्षर पटेलनं घेतल्या पाच विकेट्स 1979च्या विक्रमाशी बरोबरी

India vs England, 2nd Test Day 4: आर अश्विनच्या ( R Ashwin) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीत मोठ्या विजयाची नोंद केली. इंग्लंडला ४८२ धावांचं आव्हान पेलवलं नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ १६४ धावांत तंबूत परतला. दुसऱ्या डावात अक्षर पटेलनं ( Axar Patel) पाच विकेट्स घेत पदार्पणाचा सामना गाजवला. भारतानं हा सामना ३१७ धावांनी जिंकून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. कुलदीप यादव आणि आर अश्विन यांनी अनुक्रमे २ व ३ विकेट्स घेतल्या. या विजयासह कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) घरच्या मैदानावर सर्वाधिक २१ कसोटी जिंकण्याच्या महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) विक्रमाशी बरोबरी केली. ( Most Test wins as Indian captain at home). भारताचा हा पाचवा सर्वात मोठा विजय ठरला.

 

मॅचचे हायलाईट्स- इंग्लंडची तिसऱ्या दिवशीच हार पक्की झाली होती. आर अश्विनच्या खणखणीत शतकानं टीम इंडियाचा विजयाचा पाया भक्कम केला. त्यामुळेच टीम इंडियानं ४८२ धावांचं तगडं आव्हान ठेवलं. 

- त्यात अक्षर पटेलनं ( Axar Patel) तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात इंग्लंडला दोन धक्के दिले, आर अश्विननंही एक विकेट घेत पाहुण्यांना बॅकफूटवर पाठवले. सचिन तेंडुलकरमुळे मुंबई इंडियन्सकडून MS Dhoni खेळू शकला नाही; जाणून घ्या नेमकं काय घडलं

- गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर दोन दिवस फलंदाजी करणं हे कोणत्याही संघाला अवघड होतेच आणि त्यामुळे इंग्लंडचा पराभव अटळ होता. 

- चौथ्या दिवसाच्या पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला चार धक्के दिले. आर अश्विननं विकेटचा श्रीगणेशः केला अन् त्यानंतर अक्षर पटेल व कुलदीप यादवंही टीम इंडियाला यश मिळवून दिलं.

- बेन स्टोक्सची महत्त्वाची विकेट अश्विनच्याच नावावर होती. अश्विननं सर्वाधिक १० वेळा वेन स्टोक्सला बाद केलं. डेव्हिड वॉर्नरलाही अश्विननं १० वेळा तंबूचा रस्ता धरायला लावला.   टीम इंडियाला धक्का; क्षेत्ररक्षण करताना फलंदाजाला झाली दुखापत, स्कॅनसाठी नेलं हॉस्पिटलमध्ये  

- त्यानंतर कुलदीप यादवनं बेन फोक्सला बाद केलं. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय गोलंदाजांनी घेतलेली ती १०००वी कसोटी विकेट ठरली. 

- लंच ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात कुलदीपनं इंग्लंडचा कर्णधार जो रूटला माघारी पाठवले. त्यानंतर अक्षर पटेलनं आणखी एक विकेट घेत पदार्पणात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. १९७९साली दिलीप दोशी ( ६-१०३) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणात पाच विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर पदार्पणात पाच विकेट्स घेणारा अक्षर पटेल हा पहिलाच डावखुरा फिरकी गोलंदाज ठरला.   विराट कोहलीवर एका सामन्याच्या 'बंदी'ची टांगती तलवार; तिसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार?

- कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेणारा अक्षर हा ९वा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी मोहम्मद निस्सार ( १९३२),  वामन कुमार ( १९६१) ,  सय्यद आबीद अली ( १९६७), दिलीप दोशी ( १९७९),  नरेंद्र हिरवानी ( १९८८), अमित मिश्रा ( २००८), आर अश्विन ( २०११), मोहम्मद शमी ( २०१३) यांनी असा पराक्रम केला आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनविराट कोहलीमहेंद्रसिंग धोनी