'नॉन स्ट्राईक'र आर अश्विनचे डावपेच; जेम्स अँडरसन वैतागला, अम्पायरकडे केली तक्रार अन्... 

India vs England 2nd Test Live Update : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही आक्रमक सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 10:02 AM2024-02-03T10:02:29+5:302024-02-03T10:02:43+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 2nd Test Live Marathi Update: James Anderson wasn't happy with R Ashwin standing close to the umpire as the non-striker's  | 'नॉन स्ट्राईक'र आर अश्विनचे डावपेच; जेम्स अँडरसन वैतागला, अम्पायरकडे केली तक्रार अन्... 

'नॉन स्ट्राईक'र आर अश्विनचे डावपेच; जेम्स अँडरसन वैतागला, अम्पायरकडे केली तक्रार अन्... 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 2nd Test Live Update : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जैस्वालने त्याचा पवित्रा कायम राखताना सुरेख फटके खेचले आणि आर अश्विन त्याला तोडीसतोड साथ देताना दिसला. यशस्वी स्ट्राईकवरून इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडत होता, तेच नॉन स्ट्राईकवरून अश्विनचे वेगळेच डावपेच सुरू होते. त्यामुळे जेम्स अँडरसन वैतागला..


रोहित शर्मा ( १४ ) व शुबमन गिल ( ३४ ) हे बाद झाल्यानंतर जैस्वालने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह ( २७) १३१ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वी व पदार्पणवीर रजत पाटीदार यांनी १२४ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. रजतने ७२ चेंडूंत ३२ धावांची संयमी खेळी केली. अक्षर पटेलसह ( २७) त्याने पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. यशस्वीने साथीदारांना सोबतीला घेऊन चौघांसोबत ४० धावांहून अधिक धावांची भागीदारी करून इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. पहिल्या दिवशी १७९ धावांवर नाबाद राहून यशस्वीने अनेक विक्रम मोडले आणि भारताला ६ बाद ३३६ धावांपर्यंत पोहोचवले होते आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवातही त्याने आक्रमकच केली.

Image
यशस्वी १८३ धावांवर असताना जेम्स अँडरसनने अप्रतिम चेंडूवर LBW ची अपील केली आणि DRS ही घेतला. पण, चेंडू काही सेंटीमीटरच्या अंतराने यष्टींच्या जवळून जात होता आणि त्यामुळे यशस्वी थोडक्यात वाचला. चेंडू थोडा खाली राहिला असता तर इंग्लंडचा DRS यशस्वी झाला असता. आर अश्विनही चांगली फलंदाजी करताना दिसला आणि त्याने काही सुरेख चौकारही मिळवले. पण, नॉन स्ट्राईक एंडला उभा राहूनही अश्विन डावपेच आखत होता आणि त्याचा अँडरसनला त्रास झालेला पाहायला मिळाला. अँडरसन गोलंदाजी करायला रन अप घेत असताना नॉन स्ट्राईकवर उभा असलेला अश्विन मुद्दाम हातवारे करताना दिसला. त्यामुळे अँडरसन अम्पायरच्या इथे येऊन थांबला आणि तक्रार करताना दिसला. त्याला अश्विनने उत्तर दिले की, मी मुद्दाम अम्पायरच्या रेषेत उभा आहे, जेणेकरून सहकाऱ्याला DRS घेताना माझी मदत होईल.  


Web Title: IND vs ENG 2nd Test Live Marathi Update: James Anderson wasn't happy with R Ashwin standing close to the umpire as the non-striker's 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.