India vs England 2nd Test Live Update : भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावातही आक्रमक सुरुवात केली. यशस्वी जैस्वालने त्याचा पवित्रा कायम राखताना सुरेख फटके खेचले आणि आर अश्विन त्याला तोडीसतोड साथ देताना दिसला. यशस्वी स्ट्राईकवरून इंग्लंडच्या गोलंदाजांना झोडत होता, तेच नॉन स्ट्राईकवरून अश्विनचे वेगळेच डावपेच सुरू होते. त्यामुळे जेम्स अँडरसन वैतागला..
रोहित शर्मा ( १४ ) व शुबमन गिल ( ३४ ) हे बाद झाल्यानंतर जैस्वालने तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यरसह ( २७) १३१ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. त्यानंतर यशस्वी व पदार्पणवीर रजत पाटीदार यांनी १२४ चेंडूंत ७० धावांची भागीदारी केली. रजतने ७२ चेंडूंत ३२ धावांची संयमी खेळी केली. अक्षर पटेलसह ( २७) त्याने पाचव्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली. यशस्वीने साथीदारांना सोबतीला घेऊन चौघांसोबत ४० धावांहून अधिक धावांची भागीदारी करून इंग्लंडला बॅकफूटवर फेकले. पहिल्या दिवशी १७९ धावांवर नाबाद राहून यशस्वीने अनेक विक्रम मोडले आणि भारताला ६ बाद ३३६ धावांपर्यंत पोहोचवले होते आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवातही त्याने आक्रमकच केली.