IND vs ENG 2nd Test Live Scorecard ( Marathi News) - भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ आज ३ बदलांसह मैदानावर उतरला आहे. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हे दोन बदल आहेत. मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. आजच्या सामन्यात मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि रजत पाटीदार खेळणार आहेत. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी सावध सुरुवात केली. इंग्लंडकडून फिरकीपटूंचा मारा सुरू झाला. २० वर्षीय गोलंदाज शोएब बशीर याने कमाल करून दाखवली.
मोहम्मद सिराजला अचानक रिलीज करण्याचा घेतला निर्णय; BCCI ने सांगितलं महत्त्वाचं कारण
२०१७ नंतर मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर भारतीय संघाने ३ वेळा पुनरागमन केले आहे, तर ३ वेळा मालिका गमावली आहे आणि एक मालिका बरोबरीत सोडवली आहे. रोहित शर्मा व यशस्वी जैस्वाल यांनी सावध सुरुवात केली. इंग्लंडने पहिल्या १२ षटकांत ३ फिरकीपटूंना गोलंदाजीला आणले. २० वर्षीय शोएब बशीर याच्या पदार्पणाची फार चर्चा रंगलेली आणि तो काय करू शकतो हे त्याने दाखवून दिले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा ( १४) याला त्याने डाव्या स्लिपमध्ये ऑली पोपच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. भारताला १७.३ षटकांत ४० धावांवर पहिला धक्का बसला.
पाकिस्तानी वंशाचा ब्रिटिश नागरिक असलेल्या बशीरला व्हिसाच्या समस्येमुळे पहिल्या कसोटीसाठी वेळेत संघात सामील होता आले नव्हते. मात्र, युवा फिरकीपटूचा व्हिसाचा प्रश्न सुटला आणि आज त्याने जॅक लिचच्या जागी कसोटी पदार्पण केले. शोएब बशीरच्या गुरूचे नाव सिद्धार्थ लाहिरी, जे भारतीय आहेत. ते इंग्लंडच्या रॉयल अकादमीचे प्रमुख आहेत. बशीर काउंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेटकडून खेळतो. त्याने सहा प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. या कालावधीत १० विकेट्स घेतल्या आहेत.
Web Title: ind vs Eng 2nd test live score board : SHOAIB BASHIR REMOVES ROHIT SHARMA ON DEBUT, he goes to 14 of 41 balls, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.