India vs England, 2nd Test Day 3 : कोरोना व्हायरसच्या संकटानंतर प्रथमच प्रेक्षकांसमोर झालेल्या सामन्यात टीम इंडियानं कमाल करून दाखवली. आर अश्विननं ( R Ashwin) घरच्या मैदानावर कसोटी शतक झळकावताना इंग्लंडच्या गोलंदाजांना हतबल केलं. त्याचं हे कसोटी क्रिकेटमधील पाचवे शतक ठरलं. ऐकिकडे चेन्नईच्या खेळपट्टीवर आक्षेप नोंदवला जात असताना अश्विननं झळकावलेलं हे शतक टीकाकारांना जबरदस्त चपराकच म्हणावी लागेल. मोईन अलीच्या चेंडूवर शतकी धाव घेतल्यानंतर चेपॉक स्टेडियमवर एकच जल्लोष झाला... स्टेडियमवर उपस्थित प्रत्येक जण टाळ्यांचा कडकडाट करत होता. ड्रेसिंग रुममध्ये टीम इंडियाचा प्रत्येक सदस्य अश्विनला मानाचा मुजरा ठोकत होता. शतकी धाव घेणाऱ्या अश्विनच्याही चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता, पण त्याचवेळी नॉन स्ट्रायकर असलेल्या मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) यानंही केलेलं सेलिब्रेशन भन्नाट होतं. जणू त्यानंच शतक पूर्ण केलं, अशी भावना त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. आर अश्विनकडून इंग्लंडचा पाहुणचार; खणखणीत शतक अन् मोठा पराक्रम!
टीम इंडियाची अवस्था ६ बाद १०६...
तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात धडाधड पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडेल, असा अंदाज होता. पण, अश्विन व विराट यांनी जुन्या चेंडूचा फायदा उचलताना इंग्लंडच्या गोलंदाजांना कुटले. दोघांनीही दमदार खेळी करताना भारताची आघाडी चारशेपार नेली. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला. अम्पायर घरच्या मैदानावर अश्विननं इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केलं.विराट कोहलीनं केली चिटींग?; अम्पायरनी दिली सक्त ताकीद, टीम इंडियाला बसू शकतो फटका
आर अश्विननं शतक पूर्ण केल्यानं टीम इंडियाची आघाडी ४५० पार नेली. यासह त्यानं एकाच कसोटीत शतक व पाच विकेट्स असा पराक्रम तिसऱ्यांदा केला. इयान बॉथम यांनी पाचवेळा असा पराक्रम केला आहे. गॅरी सोबर्स, एम मोहम्मद, जॅक कॅलिस, शकिब अल हसन यांनी प्रत्येकी दोन वेळा असा पराक्रम केला आहे. रेकॉर्ड ब्रेकर R Ashwin; घरच्या मैदानावर खऱ्या अर्थानं ठरला 'सिंघम'!
भारताकडून विनू मंकड ( वि. इंग्लंड १९५२), पॉली उम्रीगर ( वि. वेस्ट इंडिज १९६२) यांनी असा पराक्रम केला आहे. अश्विननं २०११ ( वि. वेस्ट इंडिज), २०१६ ( वि. वेस्ट इंडिज) आणि आता २०२१ ( वि. इंग्लंड) यांच्याविरुद्ध हा पराक्रम करून दाखवला. अश्विन व मोहम्मद सिराज यांनी १०व्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. अश्विन १४८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०६ धावांवर माघारी परतला. भारतानं इंग्लंडसमोर ४८२ धावांचे लक्ष्य ठेवलं आहे. बेन स्टोक्सची अखिलाडूवृत्ती; बाद झाला म्हणूनं केलं निंदनीय कृत्य, Video