Join us  

India vs England, 2nd Test : R Ashwin ची ऐतिहासिक कामगिरी, टीम इंडियाचं इंग्लंडसमोर 'विराट' लक्ष्य

IND vs ENG, 2nd Test R Ashwin Century: घरच्या मैदानावर अश्विननं इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केलं. अश्विन व मोहम्मद सिराज यांनी १०व्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या.

By स्वदेश घाणेकर | Published: February 15, 2021 3:46 PM

Open in App
ठळक मुद्देआर अश्विन १४८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०६ धावांवर माघारी आर अश्विनची सातव्या विकेटसाठी विराट कोहलीसह ९६ धावांची भागीदारीदहाव्या विकेटसाठी मोहम्मद सिराजला सोबत घेऊन केल्या ४९ धावा

India vs England, 2nd Test  Day 3 : आर अश्विन ( R Ashwin) नं दुसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस गाजवला. चेन्नईच्या खेळपट्टीवर कलगीतूरा रंगत असताना या खेळपट्टीवर फलंदाजी कशी करायची, याचा धडा अश्विननं शिकवला. त्यानं कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) सह टीम इंडियाचा डावच सावरला नाही, तर इंग्लंडसमोर 'विराट' लक्ष्य उभं केलं. अश्विननं कसोटीतील पाचवे शतक पूर्ण करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यानं विराटसह ९६ धावांची भागीदारी केली. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला. घरच्या मैदानावर अश्विननं इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केलं. अश्विन व मोहम्मद सिराज यांनी १०व्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या. अश्विन १४८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकारासह १०६ धावांवर माघारी परतला. भारतानं इंग्लंडसमोर ४८२ धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.  आर अश्विनकडून इंग्लंडचा पाहुणचार; खणखणीत शतक अन् मोठा पराक्रम!

सकाळच्या सत्रात पुजारा ( ७) पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर  यष्टीरक्षक बेन फोक्स यानं सुरेख पद्धतीनं रोहित शर्माला  ( २६)  यष्टिचीत करून माघारी पाठवले. बढती मिळालेला रिषभ पंत ( ८), अजिंक्य रहाणे (१०) आणि अक्षर पटेल ( ७) एकामागोमाग माघारी परतले. भारताची अवस्था ६ बाद १०६ अशी झाली होती. आर अश्विन आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना दमवलं. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १७७ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला. चेपॉकवर सातव्या विकेटसाठी भारतीय जोडीनं केलेली ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी, करुण नायर व रवींद्र जडेजा यांनी २०१६मध्ये इंग्लंडविरुद्ध १३८ धावा आणि मोहम्मद कैफ व पार्थिव पटेल यांनी २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १०४ धावांची भागीदारी केली होती. विराट कोहलीनं केली चिटींग?; अम्पायरनी दिली सक्त ताकीद, टीम इंडियाला बसू शकतो फटका

आर अश्विन इंग्लंडविरुद्ध १०००+ धावा आणि १०० विकेट्स घेणारा सातवा खेळाडू ठरला. यापूर्वी जॉर्ज गिफन ( ऑस्ट्रेलिया), माँटी नोबल ( ऑस्ट्रेलिया), गॅरी सोबर्स ( वेस्ट इंडिज) , रिचर्ड हॅडली ( न्यूझीलंड), कपिल देव ( भारत), शेन वॉर्न ( ऑस्ट्रेलिया), शॉन पोलॉक ( दक्षिण आफ्रिका) यांनी अशी कामगिरी केली आहे.  कपिल देव यांच्यानंतर इंग्लंडविरुद्ध १००० धावा व १०० विकेट्स घेणारा अश्विन हा पहिलाच भारतीय आहे. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धही अशी कामगिरी केली आहे.  चेपॉकवर एकाच कसोटीत पाच विकेट्स व अर्धशतक करणारा आर अश्विन तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९८०मध्ये कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध आणि २०१६मध्ये रवींद्र जडेजानं इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. रेकॉर्ड ब्रेकर R Ashwin; घरच्या मैदानावर खऱ्या अर्थानं ठरला 'सिंघम'! 

आर अश्विननं  एकाच कसोटीत शतक व पाच विकेट्स असा पराक्रम तिसऱ्यांदा केला. इयान बॉथम यांनी पाचवेळा असा पराक्रम केला आहे. गॅरी सोबर्स, एम मोहम्मद, जॅक कॅलिस, शकिब अल हसन यांनी प्रत्येकी दोन वेळा असा पराक्रम केला आहे. - भारताकडून विनू मंकड ( वि. इंग्लंड १९५२), पॉली उम्रीगर ( वि. वेस्ट इंडिज १९६२) यांनी असा पराक्रम केला आहे. अश्विननं १०३ धावा व ५-१५६ ( वि. वेस्ट इंडिज, २०११), ११३ धावा व ७-८३ ( वि. वेस्ट इंडिज, २०१६)  आणि १०३* व ५-४३ ( वि. इंग्लंड, २०२१) यांच्याविरुद्ध हा पराक्रम करून दाखवला.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआर अश्विनविराट कोहलीमोहम्मद सिराज