India vs England, 2nd Test Day 3 : आर अश्विन ( R Ashwin) आणि विराट कोहली ( Virat Kohli) यांच्या ९६ धावांच्या भागीदारीनं टीम इंडियाला विजयाच्या उंबरठ्यावर आणून बसवले आहे. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात धडाधड पाच फलंदाज माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडेल, असा अंदाज होता. पण, अश्विन व विराट यांनी जुन्या चेंडूचा फायदा उचलताना इंग्लंडच्या गोलंदाजांना कुटले. दोघांनीही दमदार खेळी करताना भारताची आघाडी चारशेपार नेली. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला. अम्पायर कॉल असल्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. घरच्या मैदानावर अश्विननं इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केलं. ( R Ashwin has slammed his fifth Test hundred) विराट कोहलीनं केली चिटींग?; अम्पायरनी दिली सक्त ताकीद, टीम इंडियाला बसू शकतो फटका
- आर अश्विन आणि विराट कोहली यांनी दमदार फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना दमवलं. या दोघांनी सातव्या विकेटसाठी १७७ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला
- चेपॉकवर एकाच कसोटीत पाच विकेट्स व अर्धशतक करणारा आर अश्विन तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९८०मध्ये कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध आणि २०१६मध्ये रवींद्र जडेजानं इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.
- पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात अर्धशतक असे चेन्नईच्या खेळपट्टीवर भारतीय खेळाडूच्या बाबतीत तिसऱ्यांदा घडतंय. याआधी अजित वाडेकर ( ० व ६७ धावा वि. वेस्ट इंडिज, १९६७) आणि सचिन तेंडुलकर ( ० व १३६ धावा वि. पाकिस्तान १९९९) यांनी ही कामगिरी केलीय. विराट पहिल्या डावात शून्यावर माघारी परतला होता आणि दुसऱ्या डावात त्यानं ६२ धावा केल्या. Cheteshwar Pujara पुन्हा विचित्र पद्धतीनं बाद; रोहित, रिषभही परतले माघारी, Video
- भारताकडून विनू मंकड ( वि. इंग्लंड १९५२), पॉली उम्रीगर ( वि. वेस्ट इंडिज १९६२) यांनी असा पराक्रम केला आहे. अश्विननं २०११ ( वि. वेस्ट इंडिज), २०१६ ( वि. वेस्ट इंडिज) आणि आता २०२१ ( वि. इंग्लंड) यांच्याविरुद्ध हा पराक्रम करून दाखवला.