India vs England, 2nd Test : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पारा चढलेला पाहायला मिळाला. आर अश्विनच्या ( R Ashwin Century) खणखणीत शतकाच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या डावात २८६ धावांपर्यंत मजल मारून इंग्लंडसमोर ४८२ धावांचे लक्ष्य ठेवले. त्यानंतर अक्षर पटेल ( Axar Patel)ने दोन आणि अश्विननं एक विकेट घेत इंग्लंडला तीन धक्के दिले. तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंडच्या ३ बाद ५३ धावा झाल्या असून त्यांना अजून ४२९ धावा करायच्या आहेत. इंग्लंडचा चौथा फलंदाजही माघारी गेला असता, परंतु अम्पायरच्या वादग्रस्त निर्णयामुळे त्याला जीवदान मिळालं. तो फलंदाज दुसरा-तिसरा कुणी नसून कर्णधार जो रूट ( Joe Root) होता आणि त्यामुळेच विराटचा पारा चढला. ( Virat Kohli lost his cool on the umpire ). आर अश्विननं मोडला MS Dhoniचा विक्रम, चेन्नई कसोटी गाजवत नोंदवले अनेक पराक्रम!
अक्षर पटेलनं इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ली ( ३) व नाइट वॉचमन जॅक लिच ( ०) यांना माघारी पाठवले. अश्विननं दुसरा सलामीवीर रोरी बर्न्स ( २५) याचा अडथळा दूर केला आणि टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. अक्षर पटेलनं तिसऱ्या दिवसाचं अखेरचं षटक टाकलं आणि त्यात पहिल्याच चेंडूवर रूट पायचीत असल्याची अपील झाली. मैदानावरील पंच नितीन मेनन यांनी रूटला नाबाद देताच कोहलीनं DRS घेतला. त्यात चेंडू स्टम्पवर आदळत असल्याचे स्पष्ट दिसत होते, परंतु तिसऱ्या पंचांनी umpires call दिला आणि रूट वाचला. या निर्णयानंतर विराट व शास्त्री दोघंही भडकले. Team India is a family!; शतक झळकावलं R Ashwin नं पण मोहम्मद सिराजनं केलं भन्नाट सेलिब्रेशन, Video