India vs England, 2nd Test Day 1 : जवळपास वर्षभरानंतर स्टेडियममध्ये क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना रोहित शर्मानं ( Rohit Sharma) भारी मेजवानी दिली. विराट कोहली ( Virat Kohli) शुन्यावर बाद झाल्यानंतर धक्क्यात गेलेल्या चाहत्यांना रोहितच्या शतकानं संजीवनी दिली. रोहितला चिअर करण्यासाठी त्याची पत्नी रितिका सजदेह ( Ritika Sajdeh) चेन्नईच्या स्टेडियमवर पोहोचली. रोहित शतकाच्या उंबरठ्यावर असताना प्रेक्षकांसोबत रितिकाच्या मनातही धाकधुक सुरू होती. रोहितनं शतकं झळकावल्यानंतर सोशल मीडियावर फक्त अन् फक्त रितिकाची चर्चा सुरू झाली. त्यामागचं कारण स्पष्ट करणारा व्हिडीओ BCCIनं पोस्ट केला. (Some nerves and tense moments on field & in the crowd as Rohit Sharma looked eager to get to his 100) जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं; हा विक्रम कुणाला जमणार पण नाही!
दुसऱ्याच षटकात शुबमन गिल ( Shubman Gill) याची विकेट पडली, परंतु रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि चेतेश्वर पुजारा यांनी डाव सारवला. जॅक लिचनं पुजाराला ( २१) माघारी जाण्यास भाग पाडले. विराट कोहलीचा खेळ पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. मोईन अलीच्या ( Moeen Ali) अप्रतिम फिरकी चेंडूनं विराटचा त्रिफळा उडवला अन् स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली. त्यानंतर रोहित व अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांनी शतकी भागीदारी केली. रोहितच्या शतकानंतर अजिंक्यनं अर्धशतक झळकावून टीम इंडियाचा डाव आणखी मजबूत केला. अजिंक्य रहाणेचा भीमपराक्रम; विराट, रोहित यांनाही अद्याप जमला नाही 'हा' विक्रम
रोहित शर्माला त्याची मॅनेजर रितिका सजदेहने केले क्लीन बोल्ड 2015मध्ये रोहितने रितिकाला लग्नाची मागणी घातली होती. रोहितने तिच्यासमोर अंगठी ठेवत तिला लग्नाची मागणी घातली. तिनेही होकार देताच रोहितने तिला अंगठी घातली. रितिका ही स्पोर्ट्स मॅनेजर असून रोहितच्या सर्व सामन्यांमध्ये ती नेहमीच उपस्थित असते. सुरुवातील चांगले मित्र असलेले रोहित व रितिका यांनी 2015मध्ये हे नाते पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर 2018मध्ये त्यांच्या घरी नन्ही परी आली.