ठळक मुद्देरोहित शर्मा व चेतेश्वर पुजारा यांची ८५ धावांची भागीदारीशुबमन गिल व विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी
India vs England, 2nd Test Day 1 : दुसऱ्याच षटकात शुबमन गिल ( Shubman Gill) याची विकेट पडल्यानंतर टीम इंडिया अडचणीत सापडेल, असे वाटत होते. पण, चेन्नईच्या स्टेडियवर प्रेक्षकांच्या पुनरागमनासोबतच रोहित शर्माचा ( Rohit Sharma) फॉर्मही परतला. रोहितची फटकेबाजी पाहून प्रेक्षक जल्लोष करतच होते, त्यात कर्णधार विराट कोहलीही ( Virat Kohli) आनंद व्यक्त करताना दिसला. रोहितचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला होता, पण आज रोहितची तुफान फटकेबाजी पाहायला मिळत आहे. पिवळं जॅकेट, डोळ्यावर गॉगल; चेन्नई कसोटीत सर्वांचे लक्ष वेधणारी 'ती' कोण? नाणेफेकिचा कौल बाजूने लागल्यावर टीम इंडियानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज नदीम यांना विश्रांती देत दुसऱ्या कसोटीत कुलदीप यादव, मोहम्मद सिराज व अक्षर पटेल ( पदार्पण) यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली. शुबमन गिल ( Shubman Gill) दुसऱ्याच षटकात माघारी परतला. ऑली स्टोननं त्याला पायचीत केलं. घरच्या मैदानावर भारतीय सलामीवीर पायचीत होण्याची ही पाचवी वेळ ठरली. यापूर्वी १९९०मध्ये डब्लू व्ही रमण ( वि. न्यूझीलंड), मुरली विजय ( वि. श्रीलंका, २०१५), अभिनव मुकुंद ( वि. वेस्ट इंडिज, २०१७) आणि लोकेश राहुल ( वि. वेस्ट इंडिज, २०१९) हे पायचीत झाले होते. ब्रिस्बेनमध्ये मिळवून दिला विजय, चेन्नईत वाचवली लाज; तरीही दुसऱ्या कसोटीतून संकटमोचक खेळाडूला डच्चू
पण, रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारानं टीम इंडियाचा डाव सावरला. रोहित त्याच्या जुन्याच फॉर्मात दिसला आणि त्याची फटकेबाजी पाहून विराट कोहलीही आनंदानं नाचू लागला... अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण, जसप्रीत बुमराहला विश्रांती; टीम इंडियानं नाणेफेक जिंकली
पाहा व्हिडीओ...