Join us  

India vs England, 2nd Test, Rohit Sharma : मुंबईकरांची चेन्नईत 'खडूस' खेळी, पहिल्या दिवसावर टीम इंडियाची पकड

India vs England, 2nd Test Day 1 : Rohit Sharma scores 161 & Ajinkya Rahane 67 runs: रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईच्या खेळाडूंनी दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस गाजवला. दोघांनी शतकी भागीदारी करताना टीम इंडियाला मोठी मजल मारून दिली.

By स्वदेश घाणेकर | Published: February 13, 2021 5:08 PM

Open in App
ठळक मुद्देरोहित शर्माच्या १६१ धावा आणि अजिंक्य रहाणेच्या ६७ धावाशुबमन गिल व विराट कोहली भोपळाही फोडण्यात अपयशी मोईन अली व जॅक लिच यांना प्रत्येकी दोन विकेट्स

India vs England, 2nd Test Day 1 : जेम्स अँडरसनला विश्रांती देणं इंग्लंडच्या संघाला महागात पडलं. शुबमन गिल व विराट कोहली शून्यावर माघारी परतले असले तरी रोहित शर्मानं ( Rohit Sharma) आज इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांनीही त्याला चांगली साथ दिली. पुजारा मोठी खेळी करू शकला नसला तरी संघ अडचणीत असताना तो रोहित सोबत उभा राहिला. अजिंक्यनंही अर्धशतक झळकावताना टीम इंडियाच्या धावांत भर घातली. टीम इंडियानं दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ६ बाद ३०० धावा केल्या. रोहित २३१ चेंडूंत १८ चौकार व २ षटकारांसह १६१ धावांवर माघारी परतला.  रिषभ पंतनं अखेरच्या काही षटकांत दमदार फटकेबाजी केली.  

मॅचचे हायलाईट्स- जेम्स अँडरसच्या जागी संघात स्थान मिळालेल्या ऑली स्टोननं त्याच्या पहिल्याच षटकात शुबमन गिल ( Shubman Gill) याला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला.

- रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि  चेतेश्वर पुजारा यांनी डाव सारवला. जॅक लिचनं पुजाराला ( २१) माघारी जाण्यास भाग पाडले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माचं शतक अन् सोशल मीडियावर चर्चा रितिकाची, Video पाहिल्यावर समजेल कारण! 

- कर्णधार विराट कोहलीचा खेळ पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांच्या पदरी निराशा पडली. मोईन अलीच्या ( Moeen Ali) अप्रतिम फिरकी चेंडूनं विराटचा त्रिफळा उडवला अन् स्टेडियमवर स्मशान शांतता पसरली.  

- रोहितने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. त्याच्या फटकेबाजीनं इंग्लंडच्या गोलंदाजांना बेहाल केलं. रोहितनं शतकी खेळीसह अनेक विक्रमही नावावर केले. कसोटी क्रिकेटमधील त्याचे हे ७ वे शतक ठरल, परंतु इंग्लंडविरुद्धचं पहिलंच शतक होतं. अजिंक्य रहाणेचा भीमपराक्रम; विराट, रोहित यांनाही अद्याप जमला नाही 'हा' विक्रम

- रोहितनं झळकावलेल्या ७ शतकांमध्ये त्यानं चौथ्यांदा १५०+ धावा केल्या.  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १५०+ धावा करणाऱ्या सलामीवीरांमध्ये रोहित तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. वीरेंद्र सेहवाग ( १६) व ख्रिस गेल ( १२) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. रोहितनं ११वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५०+ धावा चोपल्या आहेत.

 - रोहित ७३व्या षटकात माघारी परतला अन् स्टेडियमवर शांतता पसरली. सर्वांनी टाळ्याच्या कडकडाटात रोहितचं कौतुक केलं. त्यानं २३१ चेंडूंत १८ चौकार व २ षटकार खेचून १६१ धावा केल्या. रोहित-अजिंक्यनं चौथ्या विकेटसाठी ३१० चेंडूंत १६२ धावांची भागीदारी केली. जे कुणालाच जमलं नाही ते रोहित शर्मानं करून दाखवलं; हा विक्रम कुणाला जमणार पण नाही!

- आतापर्यंत एकाही भारतीय फलंदाजाला  घरच्या मैदानावर कसोटी क्रिकेटच्या पहिल्या दिवशी द्विशतक झळकावता आलेलं नाही. वासिम जाफरच्या नाबाद १९२ धावा  ( वि. पाकिस्तान, कोलकाता २००७) ही आतापर्यंची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे.   दशकातील सर्वोत्तम चेंडू?; विराट कोहलीही स्तब्ध, रोहितला विचारलं खरंच OUT आहे का?,Video

- रोहितपाठोपाठ आणखी एक सेट फलंदाज माघारी परतवण्यात मोईन अलीला यश आलं. त्यानं अजिंक्य  रहाणेचा त्रिफळा उडवला. अजिंक्यनं १४९ चेंडूंत ९ चौकारांसह ६७ धावा केल्या. 

- भारतात सर्वाधिक २०० आंतरराष्ट्रीय षटकार खेचण्याचा मान रोहितनं या सामन्यात कमावला.  महेंद्रसिंग धोनीच्या नावावर १७९ आणि युवराज सिंगच्या नावावर १११ षटकार आहेत.

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माअजिंक्य रहाणेविराट कोहलीशुभमन गिलचेतेश्वर पुजारा