India vs England, 2nd Test Day 4 : भारतीय संघान दुसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेनं कूच केली आहे. आर अश्विननं ( R Ashwin) चौथ्या दिवसाच्या त्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. त्यामुळे ४८२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचे चार फलंदाज मघारी परतले आहेत. टीम इंडिया विजयाच्या दिशेनं एकेक पाऊल टाकत असताना संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारताचा सलमीवीर शुबमन गिल ( Shubman Gill) याच्या हाताला दुखापत झाली आहे आणि तो आज क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर आला नाही. त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून BCCI ची वैद्यकिय टीम त्याच्यावर उपचार करत आहे. ( Shubman Gill sustained a blow ) विराट कोहलीवर एका सामन्याच्या 'बंदी'ची टांगती तलवार; तिसऱ्या कसोटीत अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार?
टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेल्या ४८२ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाला तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात तीन धक्के बसले होते. चौथ्या दिवसात आर अश्विननं त्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलनं इंग्लंडचा सलामीवीर डॉम सिब्ली ( ३) व नाइट वॉचमन जॅक लिच ( ०) यांना माघारी पाठवले. अश्विननं दुसरा सलामीवीर रोरी बर्न्स ( २५) याचा अडथळा दूर केला. चौथ्या दिवशी डॅन लॉरेन्सच्या रुपानं इंग्लंडला चौथा धक्का बसला. इंग्लंडचे ४ फलंदाज ६६ धावांवर माघारी परतले आहेत. मुंबई इंडियन्सच्या माजी फलंदाजाचं 'Miss World'शी लग्न; युवराज सिंगनं घेतली होती दोघांची फिरकी