IND vs ENG 2nd Test: भारतीय संघ आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे खेळवला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडला ३९९ धावांचे लक्ष्य दिले आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने १४ षटकांत १ बाद ६७ धावा अशी मजल मारली होती.
या सामन्यात भारताचा फलंदाज शुभमन गिलने १०४ धावांची शानदार खेळी केली. या सामन्यापूर्वी गिल खराब फॉर्ममध्ये होता. मागील ६ कसोटी सामन्यांच्या ११ डावात त्याने एकही अर्धशतक झळकावले नव्हते. अशा परिस्थितीत हा सामना त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. या डावातही गिल ४ धावा करून बाद झाला होता, मात्र श्रेयस अय्यरने त्याला वाचवले. गिलने डाव संपल्यानंतर हे मान्य केले.
इंग्लंडचा फिरकी गोलंदाज टॉम हार्टलीच्या चौथ्या चेंडूवर गिलने फ्रंटफूट शॉट खेळला आणि चेंडू त्याच्या पॅडला लागला. हार्टलेच्या आवाहनावर अंपायरने गिलला आऊट दिला होता. यावेळी गिल ४ धावा खेळत होता. यानंतर गिल यांनी श्रेयस अय्यरशी बोलून रिव्ह्यू घेण्याचे ठरवले. पॅडला लागण्यापूर्वी चेंडू त्याच्या बॅटला लागल्याचे अल्ट्राएजमध्ये दिसले. त्यामुळे पंचांना आपला निर्णय बदलावा लागला. या घटनेचा संदर्भ देत गिलने आपल्या खेळीनंतर काही गुपिते उघड केली.
गिलला वडिलांची भीती
गिलने शतक झळकावले, मात्र यानंतरही त्याला एक गोष्ट सतायतेय ती म्हणजे वडिलांची भीती. गिलने चितेविषयी म्हटले की, 'आज मी जे फटके खेळले, ते पाहून वडील मला ओरडणार यात शंका नाही. बहुतेक हॉटेलमध्ये गेल्यावरच याबाबत कळेल. तिथे ते माझ्या खेळीबद्दल नक्कीच चर्चा करतील, याआधीही त्यांनी मला माझ्या खेळाबाबत खडेबोल सुनावले आहेत.
सचिन, विराट आणि आता गिल
आधी सचिन तेंडुलकर आणि त्यानंतर विराट कोहली या सुपरस्टार फलंदाजांनी आपल्या अद्वितीय कामगिरीच्या आधारे भारतीय क्रिकेटविश्व व्यापून टाकले. या दोघांच्या पावलावर पाऊल ठेवायचा प्रयत्न आता शुभमन गीलकडून होतो आहे. कारण वयाच्या २४व्या वर्षापर्यंत सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत शुभमनने सचिन आणि विराटनंतर तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने रवि शास्त्री, वीरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंग या दिग्गजांना मागे टाकले