पहिली टेस्ट हरल्यावर टीम इंडियाला 'वॉर्निंग'; माजी क्रिकेटर म्हणाला- "अतिउत्साहीपणा करून..."

इंग्लंडच्या संघाने भारताकडून हातातून पहिल्या कसोटीचा विजय खेचून घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 02:12 PM2024-01-31T14:12:49+5:302024-01-31T14:13:33+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 2nd Test Team India gets warning Aakash Chopra says Do not get overexcited and go for a turning pitch | पहिली टेस्ट हरल्यावर टीम इंडियाला 'वॉर्निंग'; माजी क्रिकेटर म्हणाला- "अतिउत्साहीपणा करून..."

पहिली टेस्ट हरल्यावर टीम इंडियाला 'वॉर्निंग'; माजी क्रिकेटर म्हणाला- "अतिउत्साहीपणा करून..."

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 2nd Test Team India: टीम इंडिया सध्या एका वेगळ्याच संकटात सापडली आहे. फिरकीला मदत करणारी खेळपट्टी आणि फिरकीपटूंचा समर्थपणे सामना करणारे फलंदाज हे एकेकाळी भारतीय क्रिकेट संघाचे बलस्थान होते. पण इंग्लंडच्या संघाने पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा हा विश्वास चुकीचा ठरवला. इंग्लंडच्या ओली पोपने भारतीय फिरकीपटूंना चांगलाच चोप दिला. तर इंग्लंडचा फिरकीपटू हार्टली याने भारताच्या १० पैकी ७ फलंदाजांना माघारी धाडले. पहिल्या पराभवानंतर आता भारताच्या माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सक्त ताकीद दिली आहे.

"भारतीय खेळाडूंच्या मनात सध्या आत्मविश्वासाचा कमी जाणवते ही त्यांची अडचण आहे. जर आपण चांगले पिच तयार केले तर इंग्लंडचा संघ आपल्यापेक्षा चांगला खेळू शकतो. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर हे दोघे वाईट फॉर्ममध्ये आहेत. दुसऱ्या कसोटीत आपल्याकडे राहुल नाही. विराट कोहली खेळणार नाही. अष्टपैलू रवींद्र जाडेजाही संघात नाही. अशा परिस्थितीत तुमचे विचार अडकून जातात," असे ते म्हणाले.

"मला असं वाटतं की आता भारताने चांगली खेळपट्टी बनवायला हवी. उगाच अतिउत्साहीपणा करून फिरकीला मदत करणारी खेळपट्टी बनवायला जाऊ नये. सध्या तुमच्या फलंदाजांचा फॉर्म फारसा चांगला नाही. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूचे स्पिनर्स हे समसमान प्रमाणात प्रभावी ठरू शकतात. त्यांच्याकडे फारसा अनुभव असेल, पण त्याची काहीच अडचण नाही. जेव्हा आपले फलंदाजी वाईट खेळत असतात, तेव्हा टॉम हार्टली बिशन सिंग बेदीसारखे आणि जो रूट मुथय्या मुरलीधरनसारखे वाटतात," असेही आकाश चोप्रा म्हणााला.   

Web Title: IND vs ENG 2nd Test Team India gets warning Aakash Chopra says Do not get overexcited and go for a turning pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.