India vs England, 2nd Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिषभ पंत फटकेबाजी करताना स्टीव्ह स्मिथवर त्याच्या बॅटींग गार्ड मिटवल्याचा आरोप झाला. स्मिथनं चिटींग केली अशी चर्चा रंगली आणि चेन्नई कसोटीत कर्णधार विराट कोहलीवर चिटींग केल्याचा आरोप होत आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला अम्पायर नितीन मेनन यांनी सक्त ताकीद दिल्याची घटना तिसऱ्या दिवशी घडली. ( Virat Kohli receives official warning ) रेकॉर्ड ब्रेकर R Ashwin; घरच्या मैदानावर खऱ्या अर्थानं ठरला 'सिंघम'!
भारतविरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विराट खेळपट्टीवर धावताना दिसला. डॅन लॉरेन्स याच्या गोलंदाजीवर आर अश्विननं ऑफ साईडच्या दिशेनं फटका मारला आणि कोहली तिसरी धाव घेताना खेळपट्टीच्या मधोमध धावला. खेळपट्टीच्या प्रोटेक्टेड विभागातून धावल्यानं पंचांनी त्याला ताकीद दिली. बेन स्टोक्सची अखिलाडूवृत्ती; बाद झाला म्हणूनं केलं निंदनीय कृत्य, Video
नियम काय सांगतो?कलम 41.14.1 नुसार फलंदाज खेळपट्टीच्या प्रोटेक्टेड विभागात आल्यास त्यानं त्वरीत बाहेर पडावे. फलंदाज कारणाशिवाय किंवा मुद्दाम तसे करत असल्यास मैदानावरील अम्पायर त्याला ताकीद देऊ शकतात. जर पुन्हा असं घडल्यास इंग्लंडला पाच पेनल्टी धावा दिल्या जातील.
पाहा व्हिडीओ...