Hardik Pandya, IND vs ENG 3rd ODI Live Update : भारतीय गोलंदाजांचा लहरीपणा महागात पडला, इंग्लंडने ४ बाद ७४ वरून आव्हानात्मक धावा उभ्या केल्या

India vs England 3rd ODI Live Update : एखाद्या गोष्टीची सुरुवात दणक्यात केल्यानंतर त्यात सातत्य राखणे खरंच आव्हानात्मक असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 07:15 PM2022-07-17T19:15:08+5:302022-07-17T19:15:50+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd ODI Live Update :  England has done well reaching close to 259, when somewhere they were 74-4; Hardik Pandya take 4 and Yuzvendra Chahal take 3 wickets  | Hardik Pandya, IND vs ENG 3rd ODI Live Update : भारतीय गोलंदाजांचा लहरीपणा महागात पडला, इंग्लंडने ४ बाद ७४ वरून आव्हानात्मक धावा उभ्या केल्या

Hardik Pandya, IND vs ENG 3rd ODI Live Update : भारतीय गोलंदाजांचा लहरीपणा महागात पडला, इंग्लंडने ४ बाद ७४ वरून आव्हानात्मक धावा उभ्या केल्या

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd ODI Live Update : एखाद्या गोष्टीची सुरुवात दणक्यात केल्यानंतर त्यात सातत्य राखणे खरंच आव्हानात्मक असते. मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) त्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडच्या दोन स्टार फलंदाजांना भोपळ्यावर माघारी पाठवले. त्यानंतर हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) धक्के दिले. ४ बाद ७४ अशा कात्रित सापडलेला इंग्लंडचा संघ आता सहज बॅकफूटवर फेकला जाईल असे वाटत असताना  भारतीय गोलंदाजांचा लहरीपणा नडला. इंग्लंडच्या खेळाडूंनी चांगल्या भागीदारी केल्या अन् टीम इंडियाची डोकेदुखी वाढवणारी धावसंख्या उभी केली. हार्दिकने प्रभावी गोलंदाजी करताना ७-३-२४-४ अशी कामगिरीची नोंद केली. वन डेतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

रवींद्र जडेजाने एकाच षटकात टिपले दोन अफलातून झेल, हार्दिक पांड्याचा विकेट्सचा चौकार, Video 

जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) अनुपस्थिती संधी मिळालेल्या सिराजने डावातील दुसऱ्या षटकात जॉनी बेअरस्टो( ०) व जो रूट (०) यांना चार चेंडूंत माघारी पाठवले. जेसन रॉय व बेन स्टोक्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी केली. पुन्हा एकदा हार्दिक पांड्याने त्याच्या पहिल्याच षटकात विकेट मिळवली. जेसन रॉय ३१ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ४१ धावांवर बाद झाला. वेगवान बाऊन्सरवर पुढे येऊन फटका मारण्याचा बेन स्टोक्सचा प्रयत्न फसला अन् हार्दिकने स्वतःच्याच गोलंदाजीवर सुरेख झेल टिपला. स्टोक्स २७ धावांवर माघारी परतला. ४ बाद ७४ नंतर इंग्लंडला कमबॅक करणे अवघड करता आले असते, पण तसे झाले नाही.

 
मोईन अली व कर्णधार जोस बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरताना ८४ चेंडूंत ७५ धावा जोडल्या. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात मोईन अली ३४ धावांवर बाद झाला. रिषभ पंतने भन्नाट कॅच घेतला. लिएम लिव्हिंगस्टोन व बटलर यांनीही ४९ धावांची भागीदारी केली. हार्दिकने त्याच्या एकाच षटकात लिव्हिंगस्टोन ( २७) व बटलर ( ६०) यांना माघारी पाठवून भारताला पुन्हा सामन्यात आणले. पण, डेव्हिड विली व क्रेग ओव्हर्टन यांनी ८व्या विकेटसाठी ४१ चेंडूंत झटपट ४८ धावा जोडल्या अन् इंग्लंडला २५० पर्यंत पोहोचवले. युजवेंद्रने ही भागीदारी तोडताना विलीला ( १८) बाद केले.

वेळेचं गणित सावरण्यासाठी रोहितला फिरकीपटूंना गोलंदाजी द्यावी लागली होती. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर ओव्हर्टनने खणखणीत षटकार खेचला, परंतु पुढच्याच चेंडूवर षटकाराच्या प्रयत्नात तो ३२ धावांवर बाद झाला.चहलने अखेरची विकेट घेत इंग्लंडचा डाव २५९ धावांत गुंडाळला. चहलची ही तिसरी विकेट ठरली.

Web Title: IND vs ENG 3rd ODI Live Update :  England has done well reaching close to 259, when somewhere they were 74-4; Hardik Pandya take 4 and Yuzvendra Chahal take 3 wickets 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.