Join us  

IND vs ENG 3rd ODI Live Update : रोहित शर्माची इतिहास घडवण्याच्या दिशेने वाटचाल; पण, प्रमुख खेळाडू जखमी झाल्याने वाढवलं टेंशन 

India vs England 3rd ODI Live Update : मोहम्मद अझरुद्दीन आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर इंग्लंडमध्ये २०१४नंतर द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याची संधी आज रोहित शर्माला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 3:06 PM

Open in App

India vs England 3rd ODI Live Update : मोहम्मद अझरुद्दीन आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर इंग्लंडमध्ये २०१४नंतर द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याची संधी आज रोहित शर्माला आहे. १९९०मध्ये अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने २ ची वन डे मालिका २-० अशी जिंकली होती आणि त्यानंतर २०१४मध्ये धोनीने ३-१ अशा मालिकाविजयासह २४ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या वन डे सामन्यात रोहितला ८ वर्षांचा  दुष्काळ संपवण्याची संधी आहे. भारताने पहिल्या सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवला, परंतु यजमानांनी दुसऱ्या लढतीत १०० धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. आज निर्णायक लढत आहे.विराट कोहलीचा फॉर्म हा अजूनही टीम इंडियासाठी चिंतेचा विषयच आहे. पहिल्या वन डे सामन्याला मुकल्यानंतर विराटने दुसऱ्या सामन्यात एन्ट्री मारली अन् चांगले चौकारही खेचले. पण, बाहेर जाणाऱ्या उसळणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह त्याच्यासाठी पुन्हा घातक ठरला. त्यामुळे चांगल्या फॉर्मात वाटणारा विराट लगेच माघारीही परतला. त्यात तो सातत्याने विश्रांती घेतोय, त्यामुळे टीकाही होतेय. नेट्समध्ये विराटची फटकेबाजी पाहू तो आज फॉर्मात येईल, असे चाहत्यांना नेहमीच वाटते, परंतु प्रत्यक्ष अपयश त्याची पाठ सोडताना दिसत नाही.  भारताने नाणेफेक जिंकून पुन्हा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे आजच्या सामन्यात विश्रांती दिली गेली आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराज खेळणार आहे. 

भारतीय संघ - रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजसप्रित बुमराहमोहम्मद सिराजरोहित शर्माविराट कोहली
Open in App