Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI Live Update : ४,४,४,४,४,१, ४! रिषभ पंतने धु धु धुतले... हार्दिक पांड्यासह टीम इंडियाला मिळवून दिला ऐतिहासिक मालिका विजय 

Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI Live Update : ४ बाद ७२ अशा अवस्थेत असलेल्या भारतीय संघाला सावरताना या दोघांनी १३३ धावांची भागीदारी केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 10:53 PM2022-07-17T22:53:13+5:302022-07-17T22:53:33+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd ODI Live Update : Rishabh Pant finishes it with - 4,4,4,4,4,1,4. What a knock by Pant - 125* (113) guides India to a five-wicket win over England. India clinch the ODI series 2-1 | Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI Live Update : ४,४,४,४,४,१, ४! रिषभ पंतने धु धु धुतले... हार्दिक पांड्यासह टीम इंडियाला मिळवून दिला ऐतिहासिक मालिका विजय 

Rishabh Pant, IND vs ENG 3rd ODI Live Update : ४,४,४,४,४,१, ४! रिषभ पंतने धु धु धुतले... हार्दिक पांड्यासह टीम इंडियाला मिळवून दिला ऐतिहासिक मालिका विजय 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd ODI Live Update : हार्दिक पांड्या ( Hardik Pandya)  व रिषभ पंत ( Rishabh Pant) या जोडीने इंग्लंडच्या गोलंदाजांच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या. ४ बाद ७२ अशा अवस्थेत असलेल्या भारतीय संघाला सावरताना या दोघांनी १३३ धावांची भागीदारी केली. बेन स्टोक्सने अफलातून झेल घेत हार्दिकच्या अविश्वसनीय खेळीला ब्रेक लावला. पण, त्यानंतरही रिषभची फटकेबाजी सुरूच होती. त्याने वन डेतील पहिले शतक झळकावले. शतक पूर्ण झाल्यानंतर रिषभने ७ चेंडूंत ६ चौकार खेचून भारताचा ऐतिहासिक मालिका विजय पक्का केला. भारताने २-१ अशी ही मालिका जिंकली. 


रिसे टॉप्लीने पुन्हा एकदा टीम इंडियाला धक्के दिले. त्याने शिखर धवन ( १) , रोहित शर्मा ( १७) व विराट कोहली ( १७) या आघाडीच्या फलंदाजांना ३८ धावांवर माघारी पाठवले. रिषभ पंत व सूर्यकुमार यादव ही जोडी भारताचा डाव सावरतील असे वाटले होते आणि त्यांनी ४९ चेंडूत ३४ धावांची भागीदारीही केली. १६व्या षटकात मोईन अलीच्या गोलंदाजीवर रिषभला स्टम्पिंगमध्ये जीवदान मिळाले, परंतु क्रेग ओव्हर्टनने पुढच्याच षटकात सूर्यकुमारला ( १६) बाद करून इंग्लंडला यश मिळवून दिले. रिषभ व हार्दिक पांड्या सहजतेने धावा करताना दिसल्याने भारतीय चाहत्यांना आशेचा किरण दिसू लागला.  हार्दिकने ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना रिषभसह  शतकी भागीदारी केली. रिषभनेही ४५ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.  हार्दिक व रिषभ यांची ११५ चेंडूंवरील १३३ धावांची पाचव्या विकेट्सची भागीदारी ब्रेडन कार्सने संपुष्टात आणली. हार्दिक ५५ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ७१ धावांवर बाद झाला.

रिषभने १०६ चेंडूंत शतक पूर्ण केले. इंग्लंडमध्ये वन डे शतक झळकावणारा तो राहुल द्रविड ( १९९९) नंतर दुसरा भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. शतक पूर्ण झाल्यानंतर रिषभने डेव्हिड विलीच्या षटकात ४,४,४,४,४,१ अशी फटकेबाजी केली आणि त्यानंतर पुढील षटकात चौकार खेचून भारताचा विजय पक्का केला. भारताने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करून ५ विकेट्स राखून मालिका २-१ अशी खिशात घातली. रिषभने ११३ चेंडूंत १६ चौकार व २ षटकारांसह नाबाद १२५ धावा केल्या.  ८ वर्षांनंतर भारताने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली. १९९०मध्ये मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने २ ची वन डे मालिका २-० अशी जिंकली होती आणि त्यानंतर २०१४मध्ये महेंद्रसिंग  धोनीने ३-१ अशा मालिकाविजयासह २४ वर्षांचा दुष्काळ संपवला होता.  

हार्दिक पांड्याची वन डेतील सर्वोत्तम कामगिरी! 
मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) त्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडच्या दोन स्टार फलंदाजांना भोपळ्यावर माघारी पाठवले. त्यानंतर हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) धक्के दिले. ४ बाद ७४ अशा कात्रित सापडलेला इंग्लंडचा संघ आता सहज बॅकफूटवर फेकला जाईल असे वाटत असताना मधल्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी पकड गमावली. त्याचाच फायदा घेताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर, मोईन अली, लिएम लिव्हिंगस्टोन यांनी चांगल्या भागीदारी केल्या. हार्दिकने प्रभावी गोलंदाजी करताना ७-३-२४-४ अशी कामगिरीची नोंद केली. वन डेतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. जेसन रॉय (३१),  बेन स्टोक्स ( २७), मोईन अली ( ३४) लिएम लिव्हिंगस्टोन ( २७) व कर्णधार जोस बटलर ( ६०) यांनी चांगला खेळ केला. युजवेंद्रने शेवटच्या तीन विकेट्स घेताना इंग्लंडला २५९ धावांत गुंडाळले.

Web Title: IND vs ENG 3rd ODI Live Update : Rishabh Pant finishes it with - 4,4,4,4,4,1,4. What a knock by Pant - 125* (113) guides India to a five-wicket win over England. India clinch the ODI series 2-1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.