Join us  

Virat Kohli, IND vs ENG 3rd ODI Live Update : Reece Topleyच्या माऱ्यासमोर भारताचे आघाडीचे तीन फलंदाज ढेपाळले, विराट कोहलीने पुन्हा निराश केले

India vs England 3rd ODI Live Update : लॉर्ड्स वन डे सामन्यात २४ धावांत ६ विकेट्स घेत विक्रमी कामगिरी करणाऱ्या रिसे टॉप्लीने ( Reece Topley) याने तिसऱ्या सामन्यातही धक्कातंत्र कायम राखले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 8:17 PM

Open in App

India vs England 3rd ODI Live Update : लॉर्ड्स वन डे सामन्यात २४ धावांत ६ विकेट्स घेत विक्रमी कामगिरी करणाऱ्या रिसे टॉप्लीने ( Reece Topley) याने तिसऱ्या सामन्यातही धक्कातंत्र कायम राखले. त्याने पहिल्या तीन षटकांत भारताचे दोन्ही सलामीवीर शिखर धवनरोहित शर्मा  यांना माघारी पाठवून इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. टॉप्ली येथेच थांबला नाही, त्याने विराट कोहलीला १७ धावांवर बाद केले.  मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj) त्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडच्या दोन स्टार फलंदाजांना भोपळ्यावर माघारी पाठवले. त्यानंतर हार्दिक पांड्याने ( Hardik Pandya) धक्के दिले. ४ बाद ७४ अशा कात्रित सापडलेला इंग्लंडचा संघ आता सहज बॅकफूटवर फेकला जाईल असे वाटत असताना मधल्या षटकांत भारतीय गोलंदाजांनी पकड गमावली. त्याचाच फायदा घेताना इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर, मोईन अली, लिएम लिव्हिंगस्टोन यांनी चांगल्या भागीदारी केल्या. हार्दिकने प्रभावी गोलंदाजी करताना ७-३-२४-४ अशी कामगिरीची नोंद केली. वन डेतील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 

जॉनी बेअरस्टो( ०) व जो रूट (०) हे बाद झाल्यानंतर जेसन रॉय (३१) व बेन स्टोक्स ( २७) यांनी ५४ धावांची भागीदारी केली. मोईन अली ( ३४) व कर्णधार जोस बटलर यांनी ७५ धावा जोडल्या. लिएम लिव्हिंगस्टोन व बटलर यांनीही ४९ धावांची भागीदारी केली. हार्दिकने त्याच्या एकाच षटकात लिव्हिंगस्टोन ( २७) व बटलर ( ६०) यांना माघारी पाठवून भारताला पुन्हा सामन्यात आणले. पण, डेव्हिड विली व क्रेग ओव्हर्टन यांनी ८व्या विकेटसाठी ४१ चेंडूंत झटपट ४८ धावा जोडल्या अन् इंग्लंडला २५० पर्यंत पोहोचवले. युजवेंद्रने शेवटच्या तीन विकेट्स घेताना इंग्लंडला २५९ धावांत गुंडाळले. 

दुसऱ्या वन डे सामन्यात भारतीय फलंदाजी हादरवून सोडणाऱ्या रिसे टॉप्लीने इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. शिखर धवन १ धाव करून जेसन रॉयच्या हाती झेल देऊन माघारी परतला. रोहितने टॉप्लीच्या चेंडूवर पुल शॉट मारून चौकार मिळवला, परंतु टॉप्लीनेही चतुराई दाखवताना अखेरच्या चेंडूवर रोहितला ( १७) स्लीपमध्ये जो रूटच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. भारताचे दोन्ही सलामीवीर २१ धावांवर टॉप्लीने माघारी पाठवले. टॉप्ली येथेच थांबला नाही, त्याने विराट कोहलीला १७ धावांवर बाद केले. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरोहित शर्माशिखर धवनविराट कोहली
Open in App