India vs England 3rd ODI Live Update : मोहम्मद अझरुद्दीन आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यानंतर इंग्लंडमध्ये २०१४नंतर द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याची संधी आज रोहित शर्माला आहे. भारत-इंग्लंड यांच्यातल्या तिसऱ्या वन डे सामन्यात रोहितला ८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् गोलंदाजांनी त्याचा विश्वास सार्थ ठरवला. जसप्रीत बुमराहच्या ( Jasprit Bumrah) अनुपस्थिती संधी मिळालेल्या मोहम्मह सिराजने ( Mohammed Siraj) इंग्लंडच्या दोन फलंदाजांना चार चेंडूंत Duck वर माघारी पाठवले. या विकेट घेण्यापूर्वी विराट कोहलीने सिराजला दिलेला सल्ला कामी आहे.
भारताने पहिल्या सामन्यात १० विकेट्स राखून विजय मिळवला, परंतु यजमानांनी दुसऱ्या लढतीत १०० धावांनी विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. आज निर्णायक लढत आहे. भारताने नाणेफेक जिंकून पुन्हा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे आजच्या सामन्यात विश्रांती दिली गेली आहे. त्याच्या जागी मोहम्मद सिराज खेळणार आहे. मोहम्मद शमीच्या पहिल्या षटकात जेसन रॉयने तीन चौकार खेचून दमदार सुरूवात करून दिली. पण, सिराजने दुसऱ्याच षटकात जलवा दाखवला. त्याने तिसऱ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोला ( ०) श्रेयस अय्यरकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. त्यानंतर सहाव्या चेंडूवर जो रूटला (०) स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहितकडे झेल देण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे या दोन्ही विकेट घेण्यापूर्वी विराटने गोलंदाजाला काही टिप्स दिल्याचे पाहायला मिळाले.