Rohit Sharma, IND vs ENG 3rd ODI Live Update : विजयाचं सेलिब्रेशन सुरू असताना रोहित शर्मा सहकाऱ्यांवर भडकला, पाहा नेमका काय प्रसंग घडला, Video 

Winning celebration of Indian team ८ वर्षांनंतर भारताने इंग्लंडमध्ये वन डे मालिका जिंकली आहे. इंग्लंडमध्ये वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रोहित हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 11:52 PM2022-07-17T23:52:55+5:302022-07-17T23:53:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd ODI Live Update : Winning celebration of Indian team after a successful England tour, Watch Rohit Sharma's reaction, he handed over the ODI trophy to Arshdeep singh, Video | Rohit Sharma, IND vs ENG 3rd ODI Live Update : विजयाचं सेलिब्रेशन सुरू असताना रोहित शर्मा सहकाऱ्यांवर भडकला, पाहा नेमका काय प्रसंग घडला, Video 

Rohit Sharma, IND vs ENG 3rd ODI Live Update : विजयाचं सेलिब्रेशन सुरू असताना रोहित शर्मा सहकाऱ्यांवर भडकला, पाहा नेमका काय प्रसंग घडला, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd ODI Live Update : रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) नाबाद १२५ धावा आणि हार्दिक पांड्यासह ( Hardik Pandya) १३३ धावांच्या भागीदारीने भारतीय संघाने तिसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंडवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. हार्दिकने ४ विकेट्स व ७१ धावा अशी अष्टपैलू कामगिरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करून विजय मिळवताना मालिका २-१ अशी खिशात घातली.

रिसे टॉप्लीने पुन्हा एकदा टीम इंडियाला धक्के दिले. त्याने शिखर धवन ( १) , रोहित शर्मा ( १७) व विराट कोहली ( १७) या आघाडीच्या फलंदाजांना ३८ धावांवर माघारी पाठवले. रिषभ पंत व सूर्यकुमार यादव यांनी ३४ धावांची भागीदारी केली.  त्यानंतर रिषभ व हार्दिक पांड्या सहजतेने धावा करताना दिसले.  हार्दिक व रिषभ यांची ११५ चेंडूंवरील १३३ धावांची पाचव्या विकेट्सची भागीदारी ब्रेडन कार्सने संपुष्टात आणली. हार्दिक ५५ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने ७१ धावांवर बाद झाला.

रिषभने १०६ चेंडूंत शतक पूर्ण केले. शतक पूर्ण झाल्यानंतर रिषभने डेव्हिड विलीच्या षटकात ४,४,४,४,४,१ अशी फटकेबाजी केली आणि त्यानंतर पुढील षटकात चौकार खेचून भारताचा विजय पक्का केला. भारताने ४२.१ षटकांत ५ बाद २६१ धावा करून ५ विकेट्स राखून मालिका २-१ अशी खिशात घातली  १९८३च्या वर्ल्ड कपनंतर मँचेस्टर येथील भारताचा हा पहिलाच वन डे सामन्यातील विजय ठरला. ३९ वर्षांनंतर भारताने येथे वन डे मॅच जिंकली. 

इंग्लंडमध्ये वन डे व ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा रोहित शर्मा हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला.रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने १६ पैकी १३ वन डे मालिका जिंकल्या आहेत. त्याचा हा सलग ७ वा मालिका विजय आहे. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय संघाला विजयी ट्रॉफी देण्यात आली. कर्णधार रोहित शर्माने ती स्वीकारताच शिखर धवनने त्याच्यावर शॅम्पेन ओतली. त्यानंतर विराट कोहली व रिषभ पंत हेही शॅम्पेन उडवायला लागले. रोहित याची मजा घेत होता, परंतु समोर फोटोग्राफरना त्रास होईल म्हणून त्याने सहकाऱ्यांना थांबण्यास सांगितले. तरीही त्यांची मस्ती सुरू असल्याने रोहित थोडासा भडकला. 

पाहा मजेशीर व्हिडीओ...


Web Title: IND vs ENG 3rd ODI Live Update : Winning celebration of Indian team after a successful England tour, Watch Rohit Sharma's reaction, he handed over the ODI trophy to Arshdeep singh, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.