IND vs ENG, 3rd T20 : विराट कोहलीच्या खेळीला जोस बटलरचं सडेतोड उत्तर, इंग्लंडची मालिकेत २-१नं आघाडी  

IND vs ENG, 3rd T20 : Jos Buttler जॉनी बेअरस्टोनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. इयॉन मॉर्गन, जोस बटलर, अॅलेक्स हेल्स, केव्हीन पीटरसन यांच्यानंतर ट्वेंटी-20त १००० धावा करणारा तो इंग्लंडचा पाचवा फलंदाज ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 10:39 PM2021-03-16T22:39:01+5:302021-03-16T22:39:56+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 3rd T20 : England won by 8 wickets, Jos Buttler remained unbeaten on 83, take 2-1 lead  | IND vs ENG, 3rd T20 : विराट कोहलीच्या खेळीला जोस बटलरचं सडेतोड उत्तर, इंग्लंडची मालिकेत २-१नं आघाडी  

IND vs ENG, 3rd T20 : विराट कोहलीच्या खेळीला जोस बटलरचं सडेतोड उत्तर, इंग्लंडची मालिकेत २-१नं आघाडी  

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 3rd T20 Live Score : विराट कोहलीनं ( Virat Kohli) सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. लोकेश राहुल, रोहित शर्मा व इशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर विराटनं आधी रिषभ पंतच्या साथीनं पडझड थांबवली आणि नंतर हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) साथीनं मोठं लक्ष्य उभं केलं. पण, गोलंदाजांना इंग्लंडच्या धावांवर लगाम लावता आला नाही. जोस बटलरनं ( Jos Buttler) यानं एकहाती सामना फिरवला. बटलरनं ५२ चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारासह नाबाद ८३ धावा केल्या. बेअरस्टोनं २८ चेंडूंत ५ चौकारासह नाबाद ४० धावा केल्या. इंग्लंडनं हा सामना ८ विकेट्स व १० चेंडू राखून जिंकला. ( England won by 8 wickets (with 10 balls remaining)

विराट कोहलीनं ४६ चेंडूंत नाबाद ७७ धावा केल्या. त्यानं ८ चौकार व ४ षटकार खेचून १२ चेंडूंत ५६ धावा जोडल्या. हार्दिक पांड्यानं १७ धावांचे योगदान दिले आणि टीम इंडियानं ६ बाद १५६ धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियानं अखेरच्या पाच षटकांत ६९ धावा चोपल्या. लोकेश राहुलनं ( KL Rahul) पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला अन् सामन्याच्या तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्क वूडनं ( Mark Wood) त्याचा त्रिफळा उडवला. दोन सामन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरलेला रोहित शर्माही ( १५)  मोठी खेळी करू शकला नाही.  इशान किशन ( Ishan Kishan) हाही आज कमाल करू शकला नाही. पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताच्या ३ बाद २४ धावा झाल्या होत्या.  Ind Vs Eng T20 3rd Live Update Score


१२व्या षटकात रिषभ पंतनं मारलेल्या फटक्यावर दोन धावा पूर्ण केल्यानंतर इंग्लंडचा यष्टिरक्षकानं चेंडू स्टम्पच्या दिशेनं फेकला, परंतु रिषभ क्रीजवर पोहोचला होता. पण, चेंडूकडे एकही खेळाडू नसल्याचे दिसताच विराटनं तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला व खेळपट्टीच्या निम्म्यापर्यंत तो धावत आला. रिषभला क्रीज सोडणं भाग पडलं आणि त्यात तो धावबाद झाला. श्रेयस अय्यरला ( ९) मार्क वूडनं माघारी पाठवले. भारताच्या १५ षटकांत ५ बाद ८७ धावा झाल्या होत्या. विराट व हार्दिकनं सहाव्या विकेटसाठी ३५ चेंडूंत ७० धावा जोडल्या. यात विराटनं १८ चेंडूंत ५० धावा चोपल्या, तर हार्दिकनं १७ धावा केल्या.  Ind Vs Eng 3rd T20, Ind Vs Eng T20 Live Score विराट कोहलीचा भारी पराक्रम, आताच्या स्टार फलंदाजांमध्ये नोंदवला तगडा विक्रम

लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला जेसन रॉय ( ९) व जोस बटरल यांनी सावध सुरुवात करून दिली. युझवेंद्र चहलनं टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिलं, पण इंग्लंडनं  पहिल्या पॉवरप्लेमध्ये १ बाद ५७ धावा करून कमबॅक केले. डेवीड मलान आणि जोस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदर यानं ही जोडी तोडली, परंतु बटलरची फटकेबाजी सुरू होती.  त्यानं ट्वेंटी-20तील ११वे अर्धशतक पूर्ण करताना इंग्लंडला शतकी पल्ला पार करून दिला. १५व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर बटलरनं युजवेंद्र चहलचा चेंडू रिव्हर्स स्वीप खेळला. विराट हा सोपा झेल झेलेल असेच वाटले होते, परंतु त्याच्या हातून झेल सुटला अन् त्यानं तोंड लपवलं. त्यानंतर चहलनं शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर जॉनी बेअरस्टोचा झेल सोडला. इंग्लंडनं त्यानंतर सहज सामना जिंकला.  अती घाई नडली!; एका धावेसाठी टीम इंडियानं महत्त्वाची विकेट गमावली

Web Title: IND vs ENG, 3rd T20 : England won by 8 wickets, Jos Buttler remained unbeaten on 83, take 2-1 lead 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.