IND vs ENG, 3rd T20 : अती घाई नडली!; एका धावेसाठी टीम इंडियानं महत्त्वाची विकेट गमावली

Ind Vs Eng 3rd T20 Live Score : लोकेश राहुल, रोहित शर्मा व इशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 08:03 PM2021-03-16T20:03:53+5:302021-03-16T20:05:50+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG, 3rd T20 : Rishabh Pant is run out, Breaking apart the Virat Kohli/Pant partnership | IND vs ENG, 3rd T20 : अती घाई नडली!; एका धावेसाठी टीम इंडियानं महत्त्वाची विकेट गमावली

IND vs ENG, 3rd T20 : अती घाई नडली!; एका धावेसाठी टीम इंडियानं महत्त्वाची विकेट गमावली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ind Vs Eng 3rd T20 Live Score : लोकेश राहुल, रोहित शर्माइशान किशन हे झटपट माघारी परतल्यानंतर कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला होता. या दोघांनी सुरेख फटके मारताना ३८ धावांची भागीदारी केली. पण, एका धावेसाठी टीम इंडियानं महत्त्वाची विकेट गमावली. १२व्या षटकात रिषभ पंतनं मारलेल्या फटक्यावर दोन धावा पूर्ण केल्यानंतर इंग्लंडचा यष्टिरक्षकानं चेंडू स्टम्पच्या दिशेनं फेकला, परंतु रिषभ क्रीजवर पोहोचला होता. पण, चेंडूकडे एकही खेळाडू नसल्याचे दिसताच विराटनं तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला व खेळपट्टीच्या निम्म्यापर्यंत तो धावत आला. रिषभला क्रीज सोडणं भाग पडलं आणि त्यात तो धावबाद झाला. ( Terrible running, India gifted the wicket) 


लोकेश राहुलनं ( KL Rahul) पुन्हा अपयशाचा पाढा गिरवला अन् सामन्याच्या तिसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मार्क वूडनं ( Mark Wood) त्याचा त्रिफळा उडवला. मागील चार ट्वेंटी-२० सामन्यांत तो तिसऱ्यांदा भोपळ्यावर माघारी परतला आहे. ( KL Rahul has 3 ducks in the last 4 innings in T20 Internationals.) एकाच ट्वेंटी-२० मालिकेत दोन वेळा भोपळ्यावर बाद होणारा तो आशिष नेहरा ( आयसीसी वर्ल्ड कप २०१०) आणि अंबाती रायुडू ( वि. दक्षिण आफ्रिका, २०१५) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय खेळाडू आहे. ट्वेंटी-20त  सर्वाधिक ४ वेळा भोपळ्यावर बाद होण्य़ाच्या भारतीय सलामीवीराच्या विक्रमाशीही राहुलनं बरोबरी केली. रोहित शर्माही ४वेळा शून्यावर माघारी परतला आहे.  Ind Vs Eng 3rd T20, Ind Vs Eng T20 Live Score

दोन सामन्यांच्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरलेला रोहित शर्माही ( १५)  मोठी खेळी करू शकला नाही. मार्क वूडनं त्याला बाद केलं. पदार्पणात अर्धशतक झळकावणारा इशान किशन ( Ishan Kishan) हाही आज कमाल करू शकला नाही. ख्रिस जॉर्डननं त्याला ४ धावांवर माघारी पाठवले. पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारताच्या ३ बाद २४ धावा झाल्या होत्या. ट्वेंटी-20 क्रिकेटमधील पॉवरप्लेमधील टीम इंडियाची ही चौथी निचांकी खेळी आहे. २०१६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध ३ बाद २१, २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध ३ बाद २२ आणि २०१०मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ बाद २४ अशी टीम इंडियाची अवस्था झाली होती. Ind Vs Eng T20 Match Today

Web Title: IND vs ENG, 3rd T20 : Rishabh Pant is run out, Breaking apart the Virat Kohli/Pant partnership

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.