IND vs ENG 3rd T20I Live Updates : कोरोनातून सावरल्यानंतरही रोहित शर्माने पुन्हा केली मोठी चूक; BCCI ने ट्विट करून दिली माहिती

India vs England 3rd T20I Live Updates : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीपूर्वी रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली अन् त्याला महत्त्वाच्या कसोटीला मुकावे लागले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 06:57 PM2022-07-10T18:57:37+5:302022-07-10T18:58:06+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd T20I Live Updates : Before he heads out to the middle for toss, Team India Captain Rohit Sharma  obliges the fans at Trent Bridge, BCCI share pic | IND vs ENG 3rd T20I Live Updates : कोरोनातून सावरल्यानंतरही रोहित शर्माने पुन्हा केली मोठी चूक; BCCI ने ट्विट करून दिली माहिती

IND vs ENG 3rd T20I Live Updates : कोरोनातून सावरल्यानंतरही रोहित शर्माने पुन्हा केली मोठी चूक; BCCI ने ट्विट करून दिली माहिती

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd T20I Live Updates : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीपूर्वी रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली अन् त्याला महत्त्वाच्या कसोटीला मुकावे लागले. त्या कसोटीत भारताला इंग्लंडकडून लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला आणि इंग्लंडमध्ये २००७नंतर कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. बीसीसीआयने ताकीद देऊनही भारतीय संघ लंडन दौऱ्यावर भटकंती करताना, फॅन्ससोबत सेल्फी घेताना दिसले. त्यातूनच रोहितला कोरोना झाल्याची चर्चा होती. पण, कोरोनातून सावरल्यानंतरही रोहितने आज चूक केली आणि त्याचा फटका संघाला बसू शकतो. BCCI ने स्वतः त्याबाबत माहिती दिली. 

रोहित शर्मा कर्णधार म्हणून परतला अन् टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच घरी ट्वेंटी-२० मालिकेत नमवण्याचा पराक्रम केला. विराट कोहलीनंतर इंग्लंडमध्ये ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा तो भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. रोहितने पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी हातात घेतल्यानंतर भारतीय संघ अपराजित आहे आणि आतापर्यंत  १९ आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. भारत-इंग्लंड तिसरी लढत जिंकून रिकी पाँटिंगच्या सलग २० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची रोहितला आज संधी आहे.  

मालिका जिंकल्यामुळे तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळतोय का, याची उत्सुकता होती. इंग्लंडने नाणेफेक जिंकून दोन बदल केले आहेत. रवी बिश्नोई, आवेश खान, उम्रान मलिक व श्रेयस अय्यर या चौघांना आज भारताच्या प्लेइंग इलेव्हमध्ये संधी मिळाली आहे. भुवी, बुमराह, हार्दिक व चहल यांना विश्रांती दिली गेली आहे. नाणेफेकीला येण्याआधी रोहितने  ट्रेंट ब्रिज येथे मॅच पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना भेट दिली. तो  त्यांना ऑटोग्राफ देताना दिसला आणि बीसीसीआयने त्याबाबतचे फोटो शेअऱ करून ही माहिती दिली. 

भारतीय संघ - रोहित शर्मा, रिषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, आवेश खान, उम्रान मलिक, रवी बिश्नोई ( (Playing XI): Rohit Sharma (c), Rishabh Pant (w), Virat Kohli, Suryakumar Yadav, Shreyas Iyer, Dinesh Karthik, Ravindra Jadeja, Harshal Patel, Avesh Khan, Umran Malik, Ravi Bishnoi.) 
 

Web Title: IND vs ENG 3rd T20I Live Updates : Before he heads out to the middle for toss, Team India Captain Rohit Sharma  obliges the fans at Trent Bridge, BCCI share pic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.