IND vs ENG 3rd T20I Live Updates : भारतीय संघात चार बदल, मॅच विनर खेळाडूंनाच दिली विश्रांती; इंग्लंडने नाणेफेक जिंकली

India vs England 3rd T20I Live Updates : रोहित शर्मा कर्णधार म्हणून परतला अन् टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच घरी ट्वेंटी-२० मालिकेत नमवण्याचा पराक्रम केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 06:38 PM2022-07-10T18:38:10+5:302022-07-10T18:40:10+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd T20I Live Updates : England wins the toss and we will bat first, team india make 4 changes in todays match, See playing Xi | IND vs ENG 3rd T20I Live Updates : भारतीय संघात चार बदल, मॅच विनर खेळाडूंनाच दिली विश्रांती; इंग्लंडने नाणेफेक जिंकली

IND vs ENG 3rd T20I Live Updates : भारतीय संघात चार बदल, मॅच विनर खेळाडूंनाच दिली विश्रांती; इंग्लंडने नाणेफेक जिंकली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd T20I Live Updates : रोहित शर्मा कर्णधार म्हणून परतला अन् टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच घरी ट्वेंटी-२० मालिकेत नमवण्याचा पराक्रम केला. विराट कोहलीनंतर इंग्लंडमध्ये ट्वेंटी-२० मालिका जिंकणारा तो भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. रोहितने पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी हातात घेतल्यानंतर भारतीय संघ अपराजित आहे आणि आतापर्यंत  १९ आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. भारत-इंग्लंड तिसरी लढत जिंकून रिकी पाँटिंगच्या सलग २० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची रोहितला आज संधी आहे. विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. कालच्या लढतीत तो १ धाव करून माघारी परतला होता.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय संघाची वाटचाल योग्य दिशेने सुरू असल्याचे मत रोहितने दुसऱ्या सामन्यानंतर व्यक्त केले होते. पण, बीसीसीआयला विराटच्या फॉर्माची चिंता आहे. दीपक हुडा त्याला रिप्लेस करण्यासाठी बाकावर बसून आहे. गोलंदाजीच्या बाबतीत भुवनेश्वर कुमारचे सप्राईजिंक पुनरागमन झालेले दिसतेय.. जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, हर्षल पटेल हे कमाल करत आहेत. युजवेंद्र चहलला मागील वर्ल्ड कपमध्ये न खेळवण्याचा फटका संघाला बसला. त्यामुळे यावेळेस ही चूक होणार नाही, हे निश्चित आहे.

मालिका जिंकल्यामुळे तिसऱ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल पाहायला मिळतोय का, याची उत्सुकता होती.  इंग्लंडने नाणेफेक जिंकून दोन बदल केले आहेत. रवी बिश्नोई, आवेश खान, उम्रान मलिक व श्रेयस अय्यर या चौघांना आज भारताच्या प्लेइंग इलेव्हमध्ये संधी मिळाली आहे. भुवी, बुमराह, हार्दिक व चहल यांना विश्रांती दिली गेली आहे. 

भारतीय संघ - रोहित शर्मा, रिषभ पंत, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, आवेश खान, उम्रान मलिक, रवी बिश्नोई ( (Playing XI): Rohit Sharma (c), Rishabh Pant (w), Virat Kohli, Suryakumar Yadav, Shreyas Iyer, Dinesh Karthik, Ravindra Jadeja, Harshal Patel, Avesh Khan, Umran Malik, Ravi Bishnoi.) 
 

Web Title: IND vs ENG 3rd T20I Live Updates : England wins the toss and we will bat first, team india make 4 changes in todays match, See playing Xi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.