Virat Kohli, IND vs ENG 3rd T20I Live Updates : ४, ६, OUT!; विराट कोहलीची आणखी एक 'लघु' खेळी, भारताचे दोन फलंदाज माघारी, Video 

India vs England 3rd T20I Live Updates : मोठं लक्ष्य डोळ्यासमोर असताना भारताच्या सलामीवीरांनी अपयशाचा कित्ता गिरवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 09:16 PM2022-07-10T21:16:47+5:302022-07-10T21:17:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd T20I Live Updates : FOUR, SIX & Out! Virat Kohli gets into the act, smacks David Willey for four and a six on successive balls, but out in third ball, Video  | Virat Kohli, IND vs ENG 3rd T20I Live Updates : ४, ६, OUT!; विराट कोहलीची आणखी एक 'लघु' खेळी, भारताचे दोन फलंदाज माघारी, Video 

Virat Kohli, IND vs ENG 3rd T20I Live Updates : ४, ६, OUT!; विराट कोहलीची आणखी एक 'लघु' खेळी, भारताचे दोन फलंदाज माघारी, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd T20I Live Updates : मोठं लक्ष्य डोळ्यासमोर असताना भारताच्या सलामीवीरांनी अपयशाचा कित्ता गिरवला. रिषभ पंत दुसऱ्याच षटकात १ धावेवर जोस बटलरच्या हाती झेलबाद झाला. रिसे टॉपलीने ही विकेट घेऊन इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर मैदानावर आलेल्या विराट कोहलीने ( Virat Kohli) तिसऱ्या षटकात डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर पुढे येत मिड ऑनच्या दिशेने चौकार खेचला. पुढील चेंडूवर गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार खेचला. पण, पुढील चेंडूवर कव्हरच्या दिशेने मारलेला फटका फसला अन् जेसन रॉयने सुरेख झेल टिपला. विराट ६ चेंडूंत ११ धावा करून माघारी परतला अन् भारताने  १३ धावांवर दुसरा फलंदाज गमावला. 

उम्रान मलिक, रवी बिश्नोई व आवेश खान या तुलनेने अनुभव कमी असलेल्या गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांनी परीक्षा घेतली. जोस बटलर व जेसन रॉय पुन्हा अपयशी ठरले असले तरी डेवीड मलान ( Dawid Malan) व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी दमदार खेळ केला. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने तगडे आव्हान उभे केले.  भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील इंग्लंडची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी २००७मध्ये त्यांनी ६ बाद २०० धावा केल्या होत्या.

जोस बटलर ( १८)  व  जेसन रॉय ( २७) आजही फार कमाल दाखवू शकले नाही. फिल सॉल्ट ( ८) व मोईन अली ( ०) झटपट बाद झाले. मलान व लिव्हिंगस्टोन यांनी  ४३ चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. मलान ३९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ७७ धावांवर बाद झाला.  हॅरी ब्रुकने ९ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने १९ धावा कुटल्या. लिव्हिंगस्टोन २९ चेंडूंत ४ षटकांरांसह ४२ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने ७ बाद २१५ धावा केल्या. ख्रिस जॉर्डनने ३ चेंडूंत ११ धावा केल्या.

पाहा विराटची विकेट

Web Title: IND vs ENG 3rd T20I Live Updates : FOUR, SIX & Out! Virat Kohli gets into the act, smacks David Willey for four and a six on successive balls, but out in third ball, Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.