Suryakumar Yadav, IND vs ENG 3rd T20I Live Updates : एकच वादा, सूर्या दादा! सूर्यकुमार यादवने झळकावले शतक, १७ चेंडूंत कुटल्या ७८ धावा 

India vs England 3rd T20I Live Updates : ३ बाद ३१ अशा अवस्थेत असलेल्या भारताच्या मदतीला सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) धावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 10:25 PM2022-07-10T22:25:11+5:302022-07-10T22:25:34+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd T20I Live Updates :  Suryakumar Yadav brings up his maiden T20I hundred in style. He becomes the third Indian to score a 💯 against England in T20Is | Suryakumar Yadav, IND vs ENG 3rd T20I Live Updates : एकच वादा, सूर्या दादा! सूर्यकुमार यादवने झळकावले शतक, १७ चेंडूंत कुटल्या ७८ धावा 

Suryakumar Yadav, IND vs ENG 3rd T20I Live Updates : एकच वादा, सूर्या दादा! सूर्यकुमार यादवने झळकावले शतक, १७ चेंडूंत कुटल्या ७८ धावा 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England 3rd T20I Live Updates : ३ बाद ३१ अशा अवस्थेत असलेल्या भारताच्या मदतीला सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) धावला. त्याने श्रेयस अय्यरसह चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची विक्रमी भागीदारी केली. सूर्याने ४९ चेंडूंत शतक पूर्ण केले आणि इंग्लंडविरुद्ध ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या या शतकी खेळीत १२ चौकार व ५ षटकारांचा समावेश होता. 

उम्रान मलिक, रवी बिश्नोई व आवेश खान या तुलनेने अनुभव  कमी असलेल्या गोलंदाजांची इंग्लंडच्या फलंदाजांनी परीक्षा घेतली. जोस बटलर व जेसन रॉय पुन्हा अपयशी ठरले असले तरी डेवीड मलान ( Dawid Malan) व लिएम लिव्हिंगस्टोन यांनी दमदार खेळ केला. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने तगडे आव्हान उभे केले.  भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेतील इंग्लंडची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. यापूर्वी २००७मध्ये त्यांनी ६ बाद २०० धावा केल्या होत्या. जोस बटलर ( १८)  व  जेसन रॉय ( २७) आजही फार कमाल दाखवू शकले नाही. फिल सॉल्ट ( ८) व मोईन अली ( ०) झटपट बाद झाले. मलान व लिव्हिंगस्टोन यांनी  ४३ चेंडूंत ८४ धावांची भागीदारी केली. मलान ३९ चेंडूंत ६ चौकार व ५ षटकारांसह ७७ धावांवर बाद झाला.  हॅरी ब्रुकने ९ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीने १९ धावा कुटल्या. लिव्हिंगस्टोन २९ चेंडूंत ४ षटकांरांसह ४२ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडने ७ बाद २१५ धावा केल्या. ख्रिस जॉर्डनने ३ चेंडूंत ११ धावा केल्या.



रिषभ पंत ( १), विराट कोहली ( ११) व रोहित शर्मा ( ११) हे माघारी परतल्याने भारताची अवस्था ३ बाद ३१ अशी झाली होती. पण, सूर्यकुमार यादव व श्रेयस अय्यर यांनी  भारताचा संघर्ष सुरू ठेवला होता. दोघंही चांगले फटके मारताना दिसले.  या दोघांमुळे भारताच्या विजयाच्या आशा कायम होत्या. सूर्याने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याचे स्वीप फटके लाजवाब होते. लिव्हिंगस्टोनने टाकलेल्या १३व्या षटकात सूर्याने २१ धावा चोपल्या. सूर्या आज इंग्लंडच्या कोणत्याच गोलंदाजाला जुमानत नव्हता. त्याहे वाकडे तिकडे दिसणारे, परंतु परफेक्ट फटके चेंडूला अलगद सीमापार पोचवत होते. श्रेयस दुसऱ्या बाजूने सूर्याच्या फटकेबाजीचा आनंद घेताना दिसला.

श्रेयस व सूर्याने ५५ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. भारताला अखेरच्या ६ षटकांत ८४ धावा करायच्या होत्या. आजच्या सामन्यात बहारदार कामगिरी करणाऱ्या टॉपलीला गोलंदाजीला आणले आणि त्याने हा विश्वास सार्थ ठरवला. श्रेयस अय्यरला २८ धावांवर माघारी पाठवताना त्याने सूर्यासोबतची ६२ चेंडूंत ११९ धावांची भागीदारी तोडली. मॅच फिनिशर दिनेश कार्तिकने आल्याआल्या फटकेबाजीला सुरूवात केली. 

Web Title: IND vs ENG 3rd T20I Live Updates :  Suryakumar Yadav brings up his maiden T20I hundred in style. He becomes the third Indian to score a 💯 against England in T20Is

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.