Ind vs Eng Pink Ball Test : जो रूटनं ( Joe Root) अविश्वसनीय कामगिरी करताना ६.२ षटकांत ८ धावा देत टीम इंडियाचे ५ फलंदाज माघारी पाठवले. त्यामुळे टीम इंडियाचा पहिला डाव १४५ धावांवर गडगडला आणि त्यांना ३३ धावांच्या नाममात्र आघाडीवर समाधान मानावे लागले. पण, टीम इंडियानंही पहिल्याच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. अक्षर पटेलनं ( Axar Patel) पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॅव्ली याचा त्रिफळा उडवून आर अश्विनच्या ( R Ashwin) वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये ११४ वर्षांनंतर दुसऱ्यांदा कसोटी फिरकी गोलंदाजानं पहिल्याच चेंडूवर विकेट घेण्याचा पराक्रम केला. दोन्ही वेळेस भारतीय गोलंदाजांनी हा कामगिरी केली. १९८२नंतर इंग्लंडच्या कर्णधारांमध्ये जो रूट ठरला सरस, वासीम अक्रमच्याही विक्रमाशी बरोबरी
अक्षर पटेल याच्याआधी चेन्नई कसोटीत आर अश्विननं चेन्नईत खेळलेल्या पहिल्या कसोटीत पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती. चौथ्या दिवशी इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स याला झेलबाद केले होते. त्याचा झेल अजिंक्य रहाणेने टिपला होता. गेल्या १३३ वर्षांत असा कारनामा करणारा अश्विन हा तिसरा फिरकीपटू ठरला होता. त्यानंतर आता अक्षर पटेलनं ही कामगिरी केली. Ind Vs Eng Live Match जो रूटनं टीम इंडियाला मुळापासून हादरवलं, पाच विकेट्स घेत यजमानांना गुंडाळलं
अक्षर पटेलनं पहिल्या डावात सहा विकेट्स घेतल्या आणि त्यामुळे इंग्लंडचा डाव ११२ धावांवर गडगडला. त्यानंतर रोहित शर्मानं ( ६६) अर्धशतकी खेळी करून टीम इंडियाचा डाव सावरला होता, परंतु जॅक लिच ( ४-५४) आणि जो रूट ( ५-८) यांनी उल्लेखनीय कामगिरी करताना भारताचा डाव १४५ धावांवर गुंडाळला. दुसऱ्या डावात इंग्लंडचा चांगली सुरुवात करता आली नाही. अक्षरनं पहिल्याच चेंडूवर क्रॅव्लीला बाद केले आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोला बाद केले. त्यानंतर इंग्लंडच्या डॉम सिब्लीला बाद करून टीम इंडियानं मोठं यश मिळवलं. Ind Vs england Live test match score
कसोटीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारे फिरकी गोलंदाज ( Spinners to take a wicket on the first ball of a Test innings)बॉबी पील विकेट अॅलेक बॅनेर्मन, १८८८अल्बर्ट व्होग्लर विकेट टॉम हेयबर्ड, १९०७आर अश्विन विकेट रोरी बर्न्स, २०२१अक्षर पटेल विकेट झॅक क्रॅव्ली, २०२१