Ind vs Eng Pink Ball Test : अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी खेळपट्टीवरून नाराजी व्यक्त करणाऱ्या इंग्लंड संघानं त्याच खेळपट्टीवर टीम इंडियाची 'फिरकी' घेतली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या अर्धशतकानं टीम इंडियाचा डाव सावरला होता. मात्र, इंग्लंडच्या पहिल्या डावातील ११२ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियानं दोन धावांची आघाडी घेताच विकेटसत्र सुरू झालं, ते सुरूच राहिलं. इंग्लंडचा कर्णधार जो रुट ( Joe Root) यानं अनपेक्षित कामगिरी करताना गोलंदाजीत कमाल दाखवली. अम्पायरनं टोपी घेण्यास नकार दिला अन् शाहिद आफ्रिदीनं थेट ICCकडे केली तक्रार; जाणून घ्या विचित्र प्रकार
जो रुटनं हादरवून सोडलं...फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर इंग्लंडचा संघ जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन व स्टुअर्ट ब्रॉड या जलदगीत गोलंदाजांसह मैदानावर उतरला. त्यामुळे त्यांच्याकडे जॅक लिच हा एकमेव फिरकी गोलंदाज आहे. अशा परिस्थितीत कर्णधार जो रूटनं चेंडू हातात घेतला आणि टीम इंडियाला हादरवून सोडलं. ३ बाद ११४ वरून भारताचा डाव ८ बाद १२५ असा गडगडला. ११ धावांत टीम इंडियाचे पाच फलंदाज माघारी परतले. त्यापैकी रूटनं पहिल्या तीन षटकांत एकही धाव न देता तीन फलंदाजांना माघारी पाठवले. रिषभ पंत ( १), वॉशिंग्टन सुंदर ( ०) आणि अक्षर पटेल ( ०) हे तीन डावखुरे फलंदाज रूटच्या ऑफ स्पिन गोलंदाजीच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर रुटनं आर अश्विनलाही माघारी जाण्यास भाग पाडले.