Do you know the Story behind Number 97 IND vs ENG 3rd Test : मुंबईचा मुलगा सर्फराज खान ( Sarfaraz Khan) याने अखेर भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले... मुंबईच्या गल्लीपासून सुरू झालेला त्याचा प्रवास आज टीम इंडियाच्या कसोटी संघापर्यंत पोहोचला.. मुंबईतील आंतरशालेय स्पर्धा, विविध वयोगटातील स्पर्धा, रणजी करंडक गाजवणाऱ्या सर्फराजला संधी केव्हा मिळेल याची उत्सुकता सर्वांनाच होती... देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा करूनही सर्फराजसाठी टीम इंडियाच्या कसोटी संघात जागा रिक्त होत नव्हती... पण, तो आपल्या संधीची वाट पाहत राहिला... वडील नौशाद खान यांनी त्याला त्याच्या लक्ष्यापासून भरकटू दिले नाही.. या प्रवासात बरेच अडथळेही आले, त्याच्यावर वय चोरीचा आरोप झाला, मुंबईहून तो उत्तर प्रदेशकडूनही काही काळ खेळला अन् पुन्हा मुंबईत परतून मैदान गाजवले...
२००९ मध्ये १२ वर्षीय सर्फराजने हॅरिस शिल्ड ट्रॉफीत ४३९ धावांनी विक्रमी खेळी केली होती आणि तो स्टार बनला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्फराजने दबदबा राखला आहे. त्याने ४५ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६९.८५ च्या सरासरीने ३९१२ धावा केल्या आहेत आणि त्यात १४ शतकं व ११ अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ३०१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने ३७ सामन्यांत ६२९ धावा आणि ट्वेंटी-२०त ९६ सामन्यांत ११८८ धावा केल्या आहेत.
''रात को वक्त चाहिए गुजरने के लिए, सुरज मेरी मर्जी से नही निकलने वाला''
सर्फराजला कसोटी पदार्पणाची कॅप मिळाल्यानंतर समालोचनाला आलेल्या त्याच्या वडिलांनी म्हटलेली शायरी... सर्फराजच्या या यशात त्याचे वडील व गुरू नौशाद खान यांचा खूप मोठा वाटा आहे. हे स्वतः मुंबईचे प्रसिद्ध क्रिकेटपटू होते, त्यांनी लोकल सर्किटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली होती. पण ते रणजी ट्रॉफी किंवा टीम इंडियाच्या पातळीपर्यंत पोहोचू शकले नाही, म्हणून त्यांनी आपल्या मुलांद्वारे पुन्हा आपले स्वप्न पाहिले आणि मेहनत करण्यास सुरुवात केली. नौशाद खान यांनी सर्फराज खान आणि त्याचा धाकटा भाऊ मुशीर खान यांना प्रशिक्षण दिले.
आपल्या वडिलांच्या याच कष्टाला सलाम म्हणून सर्फराज 97 क्रमांकाची जर्सी घालतो... त्याच्या मते यात वडिलांचे नौशाद हे नाव आहे.. नौ -९, सात- ७ असे म्हणून तो आणि त्याचा लहान भऊ मुशीर खान हाही 97 क्रमांकाची जर्सी घालतो...