IND vs ENG 3rd Test: भारतीय संघ सध्या घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर ही मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. तर तिसरा सामना १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये होणार आहे.
अनुभवी खेळाडू विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे ब्रेक घेतला आहे. तर केएल राहुल दुखापतीमुळे तिसरा सामना खेळणार नाही. तसेच श्रेयस अय्यर आणि अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहेत. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या अनुभवी अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाच्या खेळावर अजूनही साशंकता आहे.
अशाप्रकारे, आता चाहत्यांना भारताचा नवीन आणि वेगळ्या पिढीचा कसोटी संघ तिसऱ्या म्हणजेच राजकोट कसोटीत खेळताना दिसेल. या कसोटीत सरफराज खान पदार्पण करणार हे निश्चित मानले जात आहे. तर ध्रुव जुरेलला यष्टिरक्षक म्हणून संधी मिळू शकते. असे झाल्यास हा त्याचा पदार्पणाचा सामना असेल.
राजकोट कसोटीत कर्णधार रोहित शर्मा, जडेजा, कुलदीप आणि अश्विन, बुमराह यांच्याशिवाय नव्या पिढीचे सर्व खेळाडू खेळताना दिसणार आहेत. तसेच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचीही या मालिकेसाठी निवड झालेली नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआयची योजना स्पष्ट आहे की त्यांना कसोटीतही नवीन पिढीचा संघ तयार करायचा आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग-XI
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह (उपकर्णधार).
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ:
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स (सी), बेन फोक्स (वि.), रेहान अहमद, टॉम हार्टले, शोएब बशीर, जेम्स अँडरसन, मार्क वुड, ऑली रॉबिन्सन, डॅन लॉरेन्स, गस ऍटकिन्सन .
शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा*, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी: २५-२९ जानेवारी, हैदराबाद (इंग्लंड २८ धावांनी विजयी)दुसरी कसोटी: २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम (भारत १०६ धावांनी विजयी)तिसरी कसोटी: १५-१९ फेब्रुवारी, राजकोटचौथी कसोटी: २३-२७ फेब्रुवारी, रांचीपाचवी कसोटी: ७-११ मार्च, धर्मशाला