Ind vs Eng 3rd Test Live : भारत विरुद्ध इंग्लंड ( India vs England) यांच्यात आज दिवस-रात्र कसोटी सामना सुरू झाला आहे. भारतात खेळवण्यात येणारी ही दुसरी पिंक बॉल ( Ind vs Eng Pink Ball test match) कसोटी आहे. त्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium) हा सामना होत असल्यानं सर्वच उत्सुक आहेत. जगातील सर्वाधिक प्रेक्षक क्षमता असलेले हे क्रिकेट स्टेडियम आहे आणि पुनर्बांधणीनंतर येथे पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होत आहे. या स्टेडियमचे औपचारिक उदघाटन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते झाले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते. इंग्लंडचा कर्णधार जो रूट यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ( England won the toss and decided to bat first )
भारताचा गोलंदाज
इशांत शर्मा ( Ishant Sharma) याचा हा १०० वा कसोटी सामना आहे. अशी कामगिरी करणारा इशांत हा कपिल देवनंतरचा भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज ठरणार आहे.
इशांत शर्माला २००६-०७ च्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेवेळी भारतीय संघात बोलावण्यात आले होते. मात्र त्याचे कसोटी पदार्पण झाले ते २५ मे २००७ पासून बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटीमधून. त्यानंतर पुढचे सहा महिने त्याची भारतीय संघात ये जा सुरू होती. या सामन्यात इशांतच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. ( Ind vs Eng Live Test match)
आजच्या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात चार बदल झाले आहेत. जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो आणि झॅक क्रॅवली यांचा समावेश केला गेला आहे. भारताच्या संघात दोन बदल पाहायला मिळतील. कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांच्याजागी जसप्रीत बुमराह व वॉशिंग्टन सुंदर यांची प्लेईन इलेव्हनमध्ये एन्ट्री झाली आहे. ( Ind Vs england Live test match score)
England XI: डॉमनिक सिब्ली, झॅक क्रॅवली, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, ऑली पोप, बेन फोक्स, जोफ्रा आर्चर, जॅक लिच, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन
India XI: रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, अक्षर पटेल, आर अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह
Web Title: Ind vs Eng 3rd Test Live : England won the toss and decided to bat first, know both team Playing XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.