Join us  

IND vs ENG 3rd Test LIVE: आज निधन झालेल्या टेड डेक्स्टर यांना जो रूटची अनोखी मानवंदना, ५९ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी!

इंग्लंडनं सलामीला उतरवलेली हसीब हमीद आणि रोरी बर्न्स ही नवी जोडी सुसाट खेळली. यांनी पहिल्या दिवसअखेर बिनबाद १२० धावा करताना ४२ धावांची आघाडी मिळवून दिली होती. दुसऱ्या दिवशी ही जोडी टीम इंडियाचं टेंशन वाढवताना दिसली. पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 7:23 PM

Open in App
ठळक मुद्देटीम इंडियाचे आघाडीचे तीन फलंदाज २१ धावांत बाद झाले अन् दुसरीकडे इंग्लंडच्या आघाडीच्या तिन्ही फलंदाजांनी अर्धशतक झळकावले.

ind vs eng 3rd test live updates cricket match score : पहिल्या दिवसाचा अपयश विसरून टीम इंडिया तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली. मोहम्मद शमी व रवींद्र जडेजा यांनी पहिल्या सत्रात इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून टीम इंडियाला मोठं यश मिळवून दिलं. पण, जो रूट व डेवीड मलान यांनी टीम इंडियाच्या नाकीनऊ आणले आहेत.  

आश्चर्यच; २० षटकांत संघानं केल्या ३ बाद ३२ धावा; १६४ धावांनी जिंकला प्रतिस्पर्धी संघ!

प्रथम फलंदाजीला आलेले टीम इंडियाचे शिलेदार ७८ धावांत माघारी परतले.  रोहित शर्मा ( १९), लोकेश राहुल ( ०), चेतेश्वर पुजारा ( १), विराट कोहली ( ७), अजिंक्य रहाणे ( १८), रिषभ पंत ( २), रवींद्र जडेजा ( ४), मोहम्मद शमी ( ०), जसप्रीत बुमराह ( ०) व मोहम्मद सिराज ( ३) यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर हार मानली. ३९ वर्षीय जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रत्येकी तीन, ऑली रॉबिन्सन व सॅम कुरन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.  ind vs eng 3rd test live updates, ind vs eng 3rd test live

इंग्लंडनं सलामीला उतरवलेली हसीब हमीद आणि रोरी बर्न्स ही नवी जोडी सुसाट खेळली. यांनी पहिल्या दिवसअखेर बिनबाद १२० धावा करताना ४२ धावांची आघाडी मिळवून दिली होती. दुसऱ्या दिवशी ही जोडी टीम इंडियाचं टेंशन वाढवताना दिसली. पण, ५०व्या षटकात मोहम्मद शमीनं इंग्लंडला पहिला धक्का दिला. रोरी बर्न्स व हसीब हमीद यांची भागीदारी १३५ धावांवर संपुष्टात आली. २०१६नंतरची इंग्लंडच्या सलामीवीरांनी केलेली ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. २०१६मध्ये भारताविरुद्धच अॅलिस्टर कूक व हसीब हमीद यांनी १८० धाव जोडल्या होत्या. रोरी बर्न्स १५३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६१ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यापाठोपाठ रवींद्र जडेजानं अप्रतिम चेंडू टाकत हमीदलाही त्रिफळाचीत केले. हमीदनं १९५ चेंडूंत १२ चौकारांसह ६८ धावा केल्या. ind vs eng 3rd test live scoreboard, ind vs eng 3rd test

कर्णधार जो रूट पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला. त्यानं डेवीड मलानसह इंग्लंडचा डाव सावरताना संघाची आघाडी आणखी मजबूत केली. रूटनं या कसोटीत ४००+ धावा पूर्ण केल्या. आतापर्यंत इंग्लंडच्या चारच कर्णधारांना टीम इंडियाविरुद्ध एकाच कसोटी मालिकेत ४००+ धावा करता आल्या आहेत. ( Eng Captains to smash 400 runs against India in a Test Series). टेड डेक्स्टर ( १९६१/६२), ग्रॅहम गूच ( १९९०) आणि अॅलिस्टर कूक ( २०१२) यांनी असा पराक्रम केला आहे. भारताविरुद्ध सर्वाधिक २४वेळा ५०+ धवा करण्याचा विक्रमही रूटनं नावावर केला. त्यानं कूकचा ( २३) विक्रम मोडला.  ind vs eng test live, ind vs eng live test match

कोण होते टेड डेक्स्टर?इंग्लंड व ससेक्स क्लबचे माजी कर्णधार टेड डेक्स्टर यांचे वयाच्या ८६व्या वर्षी निधन झाले. ( Ted Dexter: Former England and Sussex captain dies aged 86). लॉर्ड टेड या टोपण नावानं ते ओळखले जायचे. त्यांनी ६२ कसोटी सामन्यांत इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आणि १९६१ ते ६४ या कालावधीत त्यांनी संघाच्या नेतृत्वाची धुराही सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली ससेक्स क्लबनं १९६८मध्ये Gillette Cup या मर्यादित षटकांच्या स्पर्धेच्या पहिल्या दोन पर्वाचे जेतेपद पटकावले होते आणि त्या जोरावर त्यांनी पुन्हा इंग्लंड संघात पुनरागमन केलं होतं. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू आज मैदानावर दंडावर काळी फित बांधून मैदानावर उतरले.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडजो रूट
Open in App