Join us  

IND vs ENG 3rd Test LIVE: भारताची डोकेदुखी वाढणार?; टीम इंडियाचा पाचवा गोलंदाज दुखापतीमुळे गेला मैदानाबाहेर!

ind vs eng 3rd test live updates cricket match score : लॉर्ड्सनंतर लीड्सवर विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी भिरकावून दिलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 10:43 PM

Open in App

ind vs eng 3rd test live updates cricket match score : लॉर्ड्सनंतर लीड्सवर विजय मिळवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या गोलंदाजांनी गोफणीत गुंडाळून दूर भिरकावून दिलं. भारताचा पहिला डाव ७८ धावांत गुंडाळून गोलंदाजांनी यजमानांना अपेक्षित सुरूवात करून दिली. त्यानंतर हसीब हमीद व रोरी बर्न या सलामीच्या नव्या जोडीनं शतकी भागीदारी करताना टीम इंडियासमोरील अडचणी वाढवल्या. त्यात भर पडली ती भारताच्या पाचव्या गोलंदाजाच्या दुखापतीची.  ind vs eng 3rd test live updates, ind vs eng 3rd test live

पहिला दिवस इंग्लंडच्या नावावर राहिला. रोहित शर्मा ( १९), लोकेश राहुल ( ०), चेतेश्वर पुजारा ( १), विराट कोहली ( ७), अजिंक्य रहाणे ( १८), रिषभ पंत ( २), रवींद्र जडेजा ( ४), मोहम्मद शमी ( ०), जसप्रीत बुमराह ( ०) व मोहम्मद सिराज ( ३) अशी टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रत्येकी तीन, ऑली रॉबिन्सन व सॅम कुरन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. ind vs eng 3rd test live scoreboard, ind vs eng 3rd test

इंग्लंडनं आजच्या कसोटीत सलामीला हसीब हमीद आणि रोरी बर्न्स ही नवी जोडी उतरवली अन् त्या दोघांनी संयमी खेळ करताना इंग्लंडला आघाडी मिळवून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७८+ धावा करताना एक वेगळा विक्रमही नोंदवला. हमीदनं ११४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले, तर बर्न्सही अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. दरम्यान, टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यानं दुखापतीमुळे मैदान सोडले आहे. क्षेत्ररक्षण करताना त्याला ही दुखापत झाली आहे. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे सामन्यानंतर स्पष्ट होईल. ( Ravindra Jadeja is currently off the field after appearing to hurt himself while diving to save the ball.) 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजा
Open in App