IND vs ENG 3rd Test LIVE: जो रूट एकटा भिडला, लॉर्ड्स विजयानंतर हवेत असलेल्या टीम इंडियाचा 'गर्वा'चा फुगा फोडला!

ind vs eng 3rd test live updates cricket match score : २०२१ कॅलेंडर वर्षात इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याला रोखणं जरा अवघडच आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 11:07 PM2021-08-26T23:07:58+5:302021-08-26T23:09:22+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd Test LIVE :  Stumps on Day 2 , captain Joe Root with a terrific hundred, England take lead by 345 runs with 2 wickets in hand   | IND vs ENG 3rd Test LIVE: जो रूट एकटा भिडला, लॉर्ड्स विजयानंतर हवेत असलेल्या टीम इंडियाचा 'गर्वा'चा फुगा फोडला!

IND vs ENG 3rd Test LIVE: जो रूट एकटा भिडला, लॉर्ड्स विजयानंतर हवेत असलेल्या टीम इंडियाचा 'गर्वा'चा फुगा फोडला!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देया कॅलेंडर वर्षात रूटनं १३६६+ धावा केल्या आहेत आणि २०१५नंतर इंग्लंडच्या कर्णधारानं कॅलेंडर वर्षात केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. ( Most runs in a calendar year for an England captain). अॅलेस्टर कूकनं २०१५मध्ये १३६४ धावा केल्या होत्या.जो रूटनं कसोटीतील २३वे शतक पूर्ण केले. यंदाच्या वर्षातील हे त्याचे सहावे, तर भारताविरुद्धचे चौथे शतक ठरले. विशेष म्हणजे रूटनं या मालिकेत तीन शतकं झळकावली.

ind vs eng 3rd test live updates cricket match score : २०२१ कॅलेंडर वर्षात इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याला रोखणं जरा अवघडच आहे. विराट कोहलीसारखा आक्रमकपणा हावभावात नसला तरी रूटच्या फलंदाजीत आक्रमकतेची उणीव जाणवली नाही. यंदाच्या वर्षातील सहावे कसोटी शतक, त्यापैकी तीन शतकं ही याच मालिकेतील.. सलग तीन शतकं दोन वेळा झळकावणाऱ्या रूटनं टीम इंडियाविरुद्ध पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यात इंग्लंडला मोठी मदत केली आहे. आघाडीच्या तीन फलंदाजांची अर्धशतकं अन् रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडनं टीम इंडियावर पराभवाचं संकटच लादलं आहे. ind vs eng 3rd test live updates, ind vs eng 3rd test live

जो रूटनं लावली टीम इंडियाची वाट; कोणालाच न जमलेले केले अनेक पराक्रम!

इंग्लंडनं सलामीला उतरवलेली हसीब हमीद आणि रोरी बर्न्स ही नवी जोडी सुसाट खेळली. रोरी बर्न्स व हसीब हमीद यांची भागीदारी १३५ धावांवर संपुष्टात आली. रोरी बर्न्स १५३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६१ धावांवर त्रिफळाचीत झाला.   हमीदनं १९५ चेंडूंत १२ चौकारांसह ६८ धावा केल्या. कर्णधार जो रूट पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला. त्यानं डेवीड मलानसह इंग्लंडचा डाव सावरताना संघाची आघाडी आणखी मजबूत केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ind vs eng 3rd test live scoreboard, ind vs eng 3rd test


२०१२च्या कोलकाता कसोटीनंतर प्रथमच इंग्लंडच्या आघाडीच्या चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी केली आहे. मोहम्मद सिराजनं ही  १३९ धावांची भागीदारी तोडली. डेविड मलान १२८ चेंडूंत ११ चौकारांसह ७० धावांवर माघारी परतला. या कॅलेंडर वर्षात रूटनं १३६६+ धावा केल्या आहेत आणि २०१५नंतर इंग्लंडच्या कर्णधारानं कॅलेंडर वर्षात केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.  अॅलेस्टर कूकनं २०१५मध्ये १३६४ धावा केल्या होत्या. जो रूटनं कसोटीतील २३वे शतक पूर्ण केले. यंदाच्या वर्षातील हे त्याचे सहावे, तर भारताविरुद्धचे चौथे शतक ठरले. विशेष म्हणजे रूटनं या मालिकेत तीन शतकं झळकावली.  ind vs eng 3rd test match, ind vs eng test live

आज निधन झालेल्या टेड डेक्स्टर यांना जो रूटची अनोखी मानवंदना, ५९ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी!
 

मोहम्मद शमीनं इंग्लंडला दोन धक्के दिले.  सुरुवातीला त्यानं जो रूटसोबत सेट होऊ पाहणाऱ्या जॉनी  बेअरस्टोला ( २९) बाद केले आणि पाठोपाठ जोस बटलर ( ७) याचीही विकेट घेतली. जसप्रीत बुमराहनं इंग्लंडच्या कर्णधाराचा झंझावात रोखला. बुमराहच्या चेंडूचा अंदाज घेण्यात यावेळी रूट चूकला अन् १६५ चेंडूंत १४ चौकारांसह १२१ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजानं मोईन अलीची ( २९) विकेट घेतली.  भारताविरुद्ध घरच्या मैदानावर दोन कसोटींत ५००+ धावा करण्याची रूटची ही दुसरी वेळ आहे ( २०१४ व २०२१). अशी कामगिरी फक्त जहीर अब्बास ( १९७८ व १९८२-८३) आणि रिकी पाँटिंग ( २००३-०३ व २०११-१२) यांनाच करता आली होती.   ind vs eng live test match

इंग्लंडनं दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४२३ धावा करताना पहिल्या डावात ३४५ धावांची आघाडी घेतली आहे.
 

Web Title: IND vs ENG 3rd Test LIVE :  Stumps on Day 2 , captain Joe Root with a terrific hundred, England take lead by 345 runs with 2 wickets in hand  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.