ind vs eng 3rd test live updates cricket match score : २०२१ कॅलेंडर वर्षात इंग्लंडचा कर्णधार जो रूट ( Joe Root) याला रोखणं जरा अवघडच आहे. विराट कोहलीसारखा आक्रमकपणा हावभावात नसला तरी रूटच्या फलंदाजीत आक्रमकतेची उणीव जाणवली नाही. यंदाच्या वर्षातील सहावे कसोटी शतक, त्यापैकी तीन शतकं ही याच मालिकेतील.. सलग तीन शतकं दोन वेळा झळकावणाऱ्या रूटनं टीम इंडियाविरुद्ध पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यात इंग्लंडला मोठी मदत केली आहे. आघाडीच्या तीन फलंदाजांची अर्धशतकं अन् रूटच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडनं टीम इंडियावर पराभवाचं संकटच लादलं आहे. ind vs eng 3rd test live updates, ind vs eng 3rd test live
जो रूटनं लावली टीम इंडियाची वाट; कोणालाच न जमलेले केले अनेक पराक्रम!
इंग्लंडनं सलामीला उतरवलेली हसीब हमीद आणि रोरी बर्न्स ही नवी जोडी सुसाट खेळली. रोरी बर्न्स व हसीब हमीद यांची भागीदारी १३५ धावांवर संपुष्टात आली. रोरी बर्न्स १५३ चेंडूंत ६ चौकार व १ षटकारासह ६१ धावांवर त्रिफळाचीत झाला. हमीदनं १९५ चेंडूंत १२ चौकारांसह ६८ धावा केल्या. कर्णधार जो रूट पुन्हा एकदा टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर अभेद्य भिंतीसारखा उभा राहिला. त्यानं डेवीड मलानसह इंग्लंडचा डाव सावरताना संघाची आघाडी आणखी मजबूत केली. या दोघांनी वैयक्तिक अर्धशतकांसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ind vs eng 3rd test live scoreboard, ind vs eng 3rd test
आज निधन झालेल्या टेड डेक्स्टर यांना जो रूटची अनोखी मानवंदना, ५९ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी!
मोहम्मद शमीनं इंग्लंडला दोन धक्के दिले. सुरुवातीला त्यानं जो रूटसोबत सेट होऊ पाहणाऱ्या जॉनी बेअरस्टोला ( २९) बाद केले आणि पाठोपाठ जोस बटलर ( ७) याचीही विकेट घेतली. जसप्रीत बुमराहनं इंग्लंडच्या कर्णधाराचा झंझावात रोखला. बुमराहच्या चेंडूचा अंदाज घेण्यात यावेळी रूट चूकला अन् १६५ चेंडूंत १४ चौकारांसह १२१ धावा करून तो माघारी परतला. त्यानंतर रवींद्र जडेजानं मोईन अलीची ( २९) विकेट घेतली. भारताविरुद्ध घरच्या मैदानावर दोन कसोटींत ५००+ धावा करण्याची रूटची ही दुसरी वेळ आहे ( २०१४ व २०२१). अशी कामगिरी फक्त जहीर अब्बास ( १९७८ व १९८२-८३) आणि रिकी पाँटिंग ( २००३-०३ व २०११-१२) यांनाच करता आली होती. ind vs eng live test match
इंग्लंडनं दुसऱ्या दिवसअखेर ८ बाद ४२३ धावा करताना पहिल्या डावात ३४५ धावांची आघाडी घेतली आहे.