IND vs ENG Live: जड्डूचे शानदार शतक! पण रवींद्रच्या चुकीमुळे पदार्पणवीर सर्फराजच्या स्फोटक खेळीचा अंत

IND vs ENG 3rd Test Live: आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 04:52 PM2024-02-15T16:52:17+5:302024-02-15T16:52:36+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd Test Live Updates After captain Rohit Sharma, Ravindra Jadeja also scored a century, he scored 100 off 198 balls, Sarfraz Khan scored 62 | IND vs ENG Live: जड्डूचे शानदार शतक! पण रवींद्रच्या चुकीमुळे पदार्पणवीर सर्फराजच्या स्फोटक खेळीचा अंत

IND vs ENG Live: जड्डूचे शानदार शतक! पण रवींद्रच्या चुकीमुळे पदार्पणवीर सर्फराजच्या स्फोटक खेळीचा अंत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi | राजकोट: भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या तिसरा कसोटी सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताला साजेशी देखील सुरूवात करता आली नाही. रोहित शर्मा वगळता आघाडीचे तिन्ही फलंदाज स्वस्तात तंबूत परतले. मग रोहित शर्माने सावध खेळी करून डाव सावरला. त्याला अष्टपैलू रवींद्र जडेजाने चांगली साथ दिली. रोहितने १९६ चेंडूत १३१ धावांची शानदार खेळी केली. मार्क वुडने भारतीय कर्णधाराला बाद करून यजमान संघाला चौथा धक्का दिला. पण जडेजाने त्याचा अप्रतिम खेळ सुरूच ठेवला. जड्डूने देखील शतक झळकावून भारताला मजबूत स्थितीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. 

जडेजाने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले, त्याला सर्फराज खानने चांगली साथ दिली. पदार्पणवीर सर्फराजने स्फोटक खेळी करताना अर्धशतक झळकावले पण जडेजाच्या एका चुकीमुळे सर्फराजला बाद व्हावे लागले. खरं तर झाले असे की जड्डू ९९ धावांवर खेळत असताना त्याने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून चूक झाली अन् सर्फराजला धावबाद व्हावे लागले. जडेजाने धाव घेण्याच्या इराद्याने दुसऱ्या टोकाला असलेल्या सर्फराजला कॉल दिला पण मार्क वुडने सर्फराजला धावबाद करण्यात कोणतीच चूक केली नाही. सर्फराजने १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ६६ चेंडूत ६२ धावा केल्या. जडेजाने १९८ चेंडूत १०० धावांची शतकी खेळी केली.

रोहितने ३ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने भारताचा डाव सावरला. खरं तर भारताच्या डावाच्या २० षटकांच्या आतच रवींद्र जडेजाला फलंदाजीसाठी यावे लागले. यशस्वी जैस्वाल (१०), रजत पाटीदार (५) आणि शुबमन गिल (०) स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मोर्चा सांभाळला. आजच्या सामन्यात भारतीय संघ काही युवा खेळाडूंसह मैदानात आहे. सर्फराज खान आणि ध्रुव जुरेल यांना पदार्पणाची संधी मिळाली. 

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज. 

तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - 
बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड व जेम्स अँडरसन.

Web Title: IND vs ENG 3rd Test Live Updates After captain Rohit Sharma, Ravindra Jadeja also scored a century, he scored 100 off 198 balls, Sarfraz Khan scored 62

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.