Join us  

IND vs ENG 3rd Test LIVE: इंग्लंडचे फॅन्स विराट कोहलीसोबत विचित्र पद्धतीनं वागले, Video Viral

ind vs eng 3rd test live updates cricket match score : भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 8:54 PM

Open in App

ind vs eng 3rd test live updates cricket match score : भारतीय फलंदाजांनी तिसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करली. भारताचा पहिला डाव ७८ धावांवर गडगडला.  रोहित शर्माच्या १९ धावा या भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावा ठरल्या. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं १८ धावा केल्या अन् १६ धावा अतिरिक्त मिळाल्या. भारताचे तळाचे पाच फलंदाज ११ धावांवर माघारी परतले. कर्णधार विराट कोहली पुन्हा अपयशी ठरला. जेम्स अँडरसननं अवघ्या ७ धावांवर विराटला बाद केले. बाद होऊन विराट माघारी जात असताना इंग्लंडच्या फॅन्सनी त्याला डिवचले अन् त्यांचा त्या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

टीम इंडिया ७८ धावांवर ऑल आऊट; ६९ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये झाली नाचक्की, पाहा सर्व विकेट्स!

रोहित शर्मा ( १९), लोकेश राहुल ( ०), चेतेश्वर पुजारा ( १), विराट कोहली ( ७), अजिंक्य रहाणे ( १८), रिषभ पंत ( २), रवींद्र जडेजा ( ४), मोहम्मद शमी ( ०), जसप्रीत बुमराह ( ०) व मोहम्मद सिराज ( ३) अशी टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हर्टन यांनी प्रत्येकी तीन, ऑली रॉबिन्सन व सॅम कुरन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडविराट कोहली
Open in App