ind vs eng 3rd test live updates cricket match score : इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातला तिसरा कसोटी सामना आजपासून सुरू होत आहे. दोन सामन्यांनंतर मालिकेत १-० अशी आघाडी घेणारी टीम इंडिया हेडिंग्ले कसोटीतही पाहुण्यांना पाणी पाजण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टीवर अधिक गवत नसल्यानं हा निर्णय घेतल्याचे कर्णधार कोहलीनं स्पष्ट केले. आजच्या सामन्यात आर अश्विनला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु विराटनं संघात बदल न करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड दोन बदलांसह मैदानावर उतणार आहे. मार्क वूडला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली, तर डॉम सिब्लीलाही बाकावर बसवले गेले आहे. त्यांच्या जागी डेवीड मलान व क्रेग ओव्हर्टन खेळतील. ind vs eng 3rd test live updates, ind vs eng 3rd test live
Shocking : फायनलपूर्वी नीरज चोप्राचा भाला घेऊन पाकिस्तानी खेळाडू भटकत होता अन्...
भारताची येथील कामगिरी
हेडिंग्ले १९८६ - दिलीप वेंगसरकर यांची परदेशात आणि विशेषत: इंग्लंडमध्ये कशी फलंदाजी बहरते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांनी या सामन्यातही पहिल्या डावात ६१ आणि दुसऱ्या डावात १०२ धावा करून संघाला विजय मिळवून दिला होता. पहिल्या डावात भारताने २७२ धावा आणि दुसऱ्या डावात २३७ धावा केल्या, तर इंग्लंडचा संघ फक्त १०२ आणि दुसऱ्या डावात १२८ धावाच करू शकला. आणि भारताला २७९ धावांनी विजय मिळवून दिला होता. बिन्नी यांनीही सामन्यात ७ बळी घेतले होते. ind vs eng 3rd test live scoreboard
हेडिंग्ले २००२ - या सामन्यात संघ प्रथम फलंदाजी करण्याचा विचार करून मैदानात उतरला. त्यावेळी संघ दोन फिरकीपटूंसह खेळत होता. सलामीवीर संजय बांगरचे अर्धशतक, राहुल द्रविड याच्या १४८ धावा, सचिन तेंडुलकर याच्या १९३ आणि कर्णधार सौरव गांगुलीच्या १२८ धावा यांच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवशी ८ बाद ६२८ धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांनी कमाल दाखवली आणि इंग्लंडच्या संघाला २७३ धावातच गुंडाळले. फॉलोऑन मिळाल्यावरदेखील इंग्लंडचा संघ ३०९ धावाच करू शकला. दुसऱ्या डावातदेखील अनिल कुंबळे याने चार बळी घेतले. त्यामुळे भारतीय संघाला आपण परदेशातदेखील विजय मिळवू शकतो, असा विश्वास मिळाला. ind vs eng 3rd test, ind vs eng 3rd test match
टीम इंडियाचा संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा ( Rohit Sharma, KL Rahul, Cheteshwar Pujara, Virat Kohli (c), Ajinkya Rahane, Rishabh Pant (wk), Ravindra Jadeja, Mohammed Shami, Ishant Sharma, Jasprit Bumrah, Mohammed Siraj)
इंग्लंडचा संघ - रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेवीड मलान, जो रूट, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, सॅम कुरन, क्रेग ओव्हर्टन, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन ( England XI: Rory Burns, Haseeb Hameed, Dawid Malan, Joe Root (c), Jonny Bairstow (wk), Jos Buttler, Moeen Ali, Sam Curran, Craig Overton, Ollie Robinson, James Anderson)