IND vs ENG 3rd Test LIVE: ईजा, बिजा, तिजा...; जेम्स अँडरसननं टीम इंडियाला दिले तीन धक्के, तेही २१ धावांत, Video 

ind vs eng 3rd test live updates cricket match score : हेडिंग्ले कसोटीतील पहिले सत्र यजमान इंग्लंडच्या नावावर राहिले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय चुकला..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2021 05:13 PM2021-08-25T17:13:11+5:302021-08-25T17:14:21+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd Test LIVE Updates Full Score Card : James Anderson is pumped with the wicket of Rahul, Pujara & Kohli; India are 21/3  | IND vs ENG 3rd Test LIVE: ईजा, बिजा, तिजा...; जेम्स अँडरसननं टीम इंडियाला दिले तीन धक्के, तेही २१ धावांत, Video 

IND vs ENG 3rd Test LIVE: ईजा, बिजा, तिजा...; जेम्स अँडरसननं टीम इंडियाला दिले तीन धक्के, तेही २१ धावांत, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देअजिंक्य रहाणे व रोहित शर्मा या मुंबईकर जोडीवर टीम इंडियाच्या पहिल्या डावाची भिस्त आहे.

ind vs eng 3rd test live updates cricket match score : हेडिंग्ले कसोटीतील पहिले सत्र यजमान इंग्लंडच्या नावावर राहिले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय चुकला.. ३९ वर्षीय गोलंदाज जेम्स अँडरसननं पहिल्याच षटकात टीम इंडियाला मोठा धक्का दिला. त्यानंतर त्यानं आणखी दोन फलंदाजांना माघारी पाठवून टीम इंडियावरील दडपण वाढवले. अँडरसननं पहिल्या स्पेलमध्ये ८ पैकी ५ षटकं निर्धाव फेकताना ६ धावांत तीन विकेट्स घेतल्या. त्यामुळे टीम इंडियाची अवस्था ३ बाद २१ अशी झाली. (  The first spell of James Anderson at Headingley: 8-5-6-3 (wickets of Rahul, Pujara and Kohli).) 

बाबर आजमच्या पाकिस्तान संघानं केली टीम इंडियाला खूप मोठी मदत!


आजच्या सामन्यात आर अश्विनला संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु विराटनं संघात बदल न करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंड दोन बदलांसह मैदानावर उतणार आहे. मार्क वूडला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली, तर डॉम सिब्लीलाही बाकावर बसवले गेले आहे. त्यांच्या जागी डेवीड मलान व क्रेग ओव्हर्टन खेळत आहेत. ( India playing with the same 11, no Ashwin in the third consecutive Test match of the series.) पहिल्या दोन कसोटीत टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देणारा अन् लॉर्ड्समध्ये शतक झळकावणारा लोकेश राहुल पहिल्याच षटकात माघारी परतला. SENA ( दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये ४ वेळा भोपळ्यावर बाद होणारा लोकेश राहुल हा टीम इंडियाचा तिसरा ( सुनील गावस्कर व डब्लू रमण) भारतीय सलामीवीर आहे. पंकज रॉय व वीरेंद्र सेहवाग प्रत्येकी ७, तर मुरली विजय ५ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.

तिसऱ्या कसोटीपूर्वी रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांना बसला धक्का; पाकिस्तानचे खेळाडू ठरलेत कारणीभूत 


चेतेश्वर पुजाराचा खराब फॉर्म याही सामन्यात कायम राहिला. अवघी एक धाव करून तो यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. कसोटीत विराट कोहली व रोहित ही जोडी प्रथमच सोबत खेळताना दिसली, परंतु त्यांना मोठी भागीदारी करता आली नाही. विराट ( ७) अँडरसनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. कसोटी क्रिकेटमध्ये अँडरसननं सर्वाधिक १० वेळा पुजाराला बाद केले. 

Shocking : फायनलपूर्वी नीरज चोप्राचा भाला घेऊन पाकिस्तानी खेळाडू भटकत होता अन्...
 


Web Title: IND vs ENG 3rd Test LIVE Updates Full Score Card : James Anderson is pumped with the wicket of Rahul, Pujara & Kohli; India are 21/3 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.