IND vs ENG Live: भारताचे 'यशस्वी' प्रत्युत्तर! तिसरा दिवस यजमानांसाठी 'शुभ', ३२२ धावांची आघाडी

IND vs ENG 3rd Test Live: गुरूवारपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2024 04:58 PM2024-02-17T16:58:16+5:302024-02-17T17:04:11+5:30

whatsapp join usJoin us
IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi Team India scored 196 for 2 in 51 overs at the end of the third day and took a lead of 322 runs, Yashasvi Jaiswal scored 104 runs and Shubman Gill scored 65 runs  | IND vs ENG Live: भारताचे 'यशस्वी' प्रत्युत्तर! तिसरा दिवस यजमानांसाठी 'शुभ', ३२२ धावांची आघाडी

IND vs ENG Live: भारताचे 'यशस्वी' प्रत्युत्तर! तिसरा दिवस यजमानांसाठी 'शुभ', ३२२ धावांची आघाडी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi | राजकोट: तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान भारतीय संघाने चमकदार कामगिरी केली. प्रथम गोलंदाजीत मग फलंदाजीत टीम इंडियाने वर्चस्व गाजवले. इंग्लिश संघाला ३१९ धावांत गुंडाळल्यानंतर भारताने मजबूत पकड बनवली. खरं तर दुसऱ्या दिवसअखेर पाहुण्या इंग्लंडने ३५ षटकांत २ बाद २०७ धावा केल्या होत्या. पण तिसरा दिवस इंग्लंडसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. बेन स्टोक्सच्या संघाला ३१९ धावांवर गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने १२६ धावांची आघाडी घेतली होती. त्यात यशस्वी-शुबमनच्या खेळीने आणखी भर पडली.

दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या भारतीय फलंदाजांनी या आघाडीत आणखी वाढ केली. भारतीय कर्णधार रोहितला (१९) दुसऱ्या डावात काही खास करता आले नाही. पण, सलामीवीर यशस्वी जैस्वालने झंझावाती शतकी खेळी केली, त्याला शुबमन गिलने चांगली साथ दिली. जैस्वालने ५ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने १३३ चेंडूत १०४ धावा केल्या. पाठीची दुखापत वाढू लागल्याने यशस्वी रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला. म्हणजेच तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रजत पाटीदारला (०) स्वस्तात माघारी जावे लागले. भारतीय संघाने तिसऱ्या दिवसअखेर ५१ षटकांत २ बाद १९६ धावा केल्या असून ३२२ धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. शुबमन गिल (६५) आणि कुलदीप यादव (३) नाबाद परतले आहेत. 


 
भारताचा पहिला डाव
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरूवात निराशाजनक झाली. पण, कर्णधार रोहित शर्माने डाव सावरला अन् दबावाच्या स्थितीत शतकी खेळी केली. त्याला रवींद्र जडेजाने चांगली साथ दिली. रोहितने १३१ चेंडूत १९६ धावांची अप्रतिम खेळी केली. याशिवाय रवींद्र जडेजाने २२५ चेंडूत ११२ धावा कुटल्या. पदार्पणवीर सर्फराज खानने स्फोटक खेळी करत पहिल्या सामन्यातील पहिला डाव अविस्मरणीय केला. त्याने ६६ चेंडूत ६२ धावा केल्या पण जड्डूच्या चुकीच्या कॉलमुळे तो धावबाद झाला. अखेर भारताने आपल्या पहिल्या डावात १३०.५ षटकांत सर्वबाद ४४५ धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात मार्क वुडने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर रेहान अहमद २ आणि जेम्स अँडसरन, टॉम हार्टली, आणि जो रूट यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.

इंग्लंडचा पहिला डाव
भारताने ४४५ धावांचा डोंगर उभारल्यानंतर पाहुणा इंग्लिश संघाव दबावात आला. पण, बेन डकेटने यजमानांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्याने १५१ चेंडूत १५३ धावांची मोठी खेळी केली. याशिवाय ओली पोप (३९) आणि कर्णधार बेन स्टोक्सने (४१) धावा केल्या. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लिश संघ मजबूत स्थितीत होता. पण तिसऱ्या दिवशी यजमानांनी पुनरागमन केले. अखेर इंग्लंड आपल्या पहिल्या डावात ७१.१ षटकांत ३१९ धावांत सर्वबाद झाला. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर कुलदीप यादव (२) आणि रवींद्र जडेजा (२) तसेच जसप्रीत बुमराह आणि आर अश्विन यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले. 

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज. 

तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - 
बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड व जेम्स अँडरसन. 

Web Title: IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi Team India scored 196 for 2 in 51 overs at the end of the third day and took a lead of 322 runs, Yashasvi Jaiswal scored 104 runs and Shubman Gill scored 65 runs 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.