India vs England 3rd Test Live Score : इंग्लंडनं तिसऱ्या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय फसला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडला २७ धावांवर दोन धक्के बसले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचे औपचारिक उद्घाटन केले गेले. इशांत शर्माचा ( Ishant Sharma) हा शंभरावा कसोटी सामना आहे आणि त्यानं टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. अक्षर पटेलनं दुसरी विकेट घेतली. दरम्यान, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. इशांत शर्माचे कसोटी सामन्यांचे शतक, पण विचित्र विक्रमात ठरला जगातला पाचवा खेळाडू!
विराट कोहली नेट्समध्ये सराव करताना ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथ ( Steve Smith) याची नकल करताना दिसला. कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाजांना डिवचण्यासाठी स्मिथ फलंदाजी करताना नकला करत असतो. ऑफ स्टम्पवर येऊन नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या फलंदाजाला धाव घेऊ नकोस, हा इशारा देण्याची त्याची ही वेगळी स्टाईल आहे. त्याची कॉपी विराटनं नेट्समध्ये केली आणि प्रत्यक्ष सामन्यातही तो असेच करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. इंग्लंड प्रथम फलंदाजी करणार; टीम इंडिया दोन बदलांसह मैदानावर उतरणार
पाहा व्हिडीओ...