India vs England, 4th T20 : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) यानं गुरूवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यातील सॉफ्ट सिग्नल (Soft Signal Controversy) निर्णयावर नाराजी व्यक्त केली. या सामन्यात सूर्यकुमार यादव ( Suryakumar Yadav) आणि वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) यांना सॉफ्ट सिग्नल निर्णयानुसार बाद दिले. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. भारताचे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag), व्हीव्हीएस लक्षम, वासीम जाफर यांच्यासह अनेकांनी निषेध व्यक्त केला. सूर्यकुमारला जेव्हा बाद दिले, तेव्हा विराटनं शिवी हासडली होती. त्यात सामन्यानंतर त्यानं सॉफ्ट सिग्नल निर्णयावर बोट ठेवताना त्याचं मत मांडलं. IND vs ENG, ODI Team : वन डे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; कृणाल पांड्या, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी
विराट म्हणाला,''कसोटी मालिकेतही असंच झालं होतं, जेव्हा अजिंक्य रहाणेच्या नजीक मी उभा होतो आणि त्यानं झेल पकडला होता, परंतु अजिंक्यला खात्री नव्हती. त्यानंतर निर्णय तिसऱ्या पंचाकडे गेला. जेव्हा क्षेत्ररक्षकालाच खात्री नसते तेव्हा स्क्वेअर लेगला उभे असलेले अम्पायरला कसं स्पष्ट दिसू शकते? त्यामुळेच सॉफ्ट सिग्नल फार महत्त्वाचे असते आणि तेव्हा या निर्णयातील त्रुटी समोर येतात. मला हे समजत नाही की अम्पायरकडे मला माहीत नाही, हा पर्याय का नसतो. अशा निर्णयानं मॅचचा निकालही बदलू शकतो.'' इंग्लंडच्या पराभवामागे रोहित शर्माचं डोकं; शार्दूल ठाकूरला दिला मंत्र अन् टीम इंडियाची बाजी
वादाच्या विकेट्स...सूर्यकुमार ३१ चेंडूंत ६ चौकार व ३ षटकार खेचून ५७ धावांवर माघारी परतला. सॅम कुरनच्या गोलंदाजीवर डेवीड मलाननं त्याचा झेल टिपला. चेंडू ग्राऊंडला टच असल्याचे दिसत होते, पण मैदानावरील पंचांनी बाद दिल्यामुळे तिसऱ्या पंचांनीही निकाल कायम राखला. २०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरनं उत्तुंग फटका मारला, तो आदिल राशिदनं तो टिपला, परंतु त्याचा पाय सीमारेषेला चिकटल्याचे स्पष्ट दिसत होते. वॉशिंग्टन सुंदरलाही ( Washington Sunder) चुकीच्या पद्धतीनं बाद ठरवण्यात आलं. सूर्यकुमार यादव, वॉशिंग्टन सुंदर झाले बाद अन् सोशल मीडियावर 'Virender'च्या नावानं शिमगा!
काय आहे सॉफ्ट सिग्नल..मैदानावरील पंचांनी सूर्यकुमार यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यांना नाबाद दिले असते तर सॉफ्ट सिग्नलच्या नियमानुसार तिसऱ्या अम्पायरनेही त्यांना नाबाद ठरवले असते. सॉफ्ट सिग्नल का दिला जातो, हा प्रश्न अनेकांच्या मनात आला असेल. याचं उत्तर आयसीसीच्या नियमात लपलं आहे. नियमानुसार जर मैदानावरील अम्पायर त्यांच्या निर्णयाबाबात निश्चित नसतील तर ते तिसऱ्या अम्पायरची मदत मागतात. पण, तसं करण्यापूर्वी सॉफ्ट सिग्नल दिला जातो. हा सिग्नल आऊट किंवा नॉट आऊटचा असतो. तिसऱ्या अम्पायरलाही निर्णय देता येत नाही तेव्हा मैदानावरील अम्पायरचा हा निर्णय अखेरचा निर्णय मानला जातो. OUT or NOT OUT; सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीला अनपेक्षित ब्रेक