Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरवले. सातत्यान अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) कर्णधार विराट कोहलीन संघात कायम राखले. सूर्यकुमार यादव आणि राहुल चहर यांनी इशान किशन व युझवेंद्र चहल यांच्याजागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पक्के केले. रोहितनं आदिल राशिदनं टाकलेल्या पहिल्याच षटकात खणखणीत षटकार व चौकार मारून टीम इंडियाला दणक्यात सुरुवात करून दिली.
रोहितनं या कामगिरीसह ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ९००० धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीनंतर ट्वेंटी-20त ९००० धावा करणारा तो पहिलाच भारतीय आहे. ( Rohit Sharma completes his 9000 runs in T20 format) शिवाय ट्वेंटी-२०त ५० षटकार पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाजाचा मानही त्यानं पटकावला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पहिल्या चेंडूवर षटकार खेचणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. ( Rohit Sharma becomes the first Indian to hit a Six in first ball of a T20I innings)
ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज विराट कोहली - ९६५०रोहित शर्मा - ९०००*सुरेश रैना - ८४९४शिखर धवन - ८१०२
ट्वेंटी-२० षटकार५० - रोहित शर्मा४८ - विराट कोहली३२ - युवराज सिंग
ख्रिस गेल - १३७२०किरॉन पोलार्ड - १०६२९शोएब मलिक - १०४८८ब्रेंडन मॅकलम - ९९२२डेव्हिड वॉर्नर - ९८२४अॅरोन फिंच - ९७१८विराट कोहली - ९६५०एबी डिव्हिलियर्स - ९१११