Ind Vs Eng 4th T20 Live Update Score : चौथ्या ट्वेंटी-20 सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर उतरवले. सातत्यान अपयशी ठरलेल्या लोकेश राहुलला ( KL Rahul) कर्णधार विराट कोहलीन संघात कायम राखले. सूर्यकुमार यादव आणि राहुल चहर यांनी इशान किशन व युझवेंद्र चहल यांच्याजागी प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान पक्के केले. रोहितनं आदिल राशिदनं टाकलेल्या पहिल्याच षटकात खणखणीत षटकार व चौकार मारून टीम इंडियाला दणक्यात सुरुवात करून दिली. पण, याही सामन्यात तो मोठी खेळी करू शकला नाही.
रोहितनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ९००० धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीनंतर ट्वेंटी-20त ९००० धावा करणारा तो पहिलाच भारतीय आहे. शिवाय ट्वेंटी-२०त ५० षटकार पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाजाचा मानही त्यानं पटकावला. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पहिल्या चेंडूवर षटकार खेचणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. ( ट्वेंटी-२०त सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज : विराट कोहली - ९६५०,
रोहित शर्मा - ९०००* , सुरेश रैना - ८४९४, शिखर धवन - ८१०२). पण, जोफ्रा आर्चरनं चौथ्या षटकात स्वतःच्याच गोलंदाजीवर रोहितचा सुरेख रिटर्न कॅच टिपला. रोहितनं १२ चेंडूंत १२ धावा केल्या.
त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवनं ( Suryakumar Yadav) पहिल्याच चेंडूवर नटराजन शॉट खेळून षटकार खेचला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच चेंडूवर षटकार खेचणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज आहे. Ind Vs Eng 4th T20, Ind Vs Eng 4th T20 Live Score
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त पहिल्या चेंडूवर षटकार खेचणारे खेळाडू ( पूर्ण सदस्य)
सोहेल तन्वीर वि. भारत, २००७
मंगालिसो मेसेह्ले वि. श्रीलंका, २०१७
सूर्यकुमार यादव वि. इंग्लंड, २०२१
पाहा व्हिडीओ...Web Title: IND vs ENG, 4th T2O : Suryakumar Yadav becomes the first Indian to start international career with a first ball SIX, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.